Thursday, August 13, 2026
Homeजळगावसावकारी ( नियमन ) अधिनियम २०१४ कलम १८ अंतर्गत यावल शहरातील २...

सावकारी ( नियमन ) अधिनियम २०१४ कलम १८ अंतर्गत यावल शहरातील २ दोन जणांची आज होणार सुनावणी.

सावकारी ( नियमन ) अधिनियम २०१४ कलम १८ अंतर्गत यावल शहरातील २ दोन जणांची आज होणार सुनावणी.

यावल  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     दि.१२
महाराष्ट्र ( सावकारी ) नियमन अधिनियम २०१४ कलम १८ अंतर्गत यावल शहरातील रमेश दगडू जोगी राहणार फालक नगर तसेच खिलचन अनिल फेगडे राहणार सुतार वाडा यावल यांना दिनांक १३/८/२०२६ रोजी सुनावणीची नोटीस जळगाव येथील सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक धर्मराज पाटील यांनी दिली आहे.

दिनकर गोविंदा इंगळे पूर्णवाद नगर फैजपूर विरुद्ध रमेश दगडू जोगी खेलचंद अनिल फेगडे यांना दिलेल्या सुनावणी नोटीस नमूद करण्यात आले आहे की

अर्जदार दिनकर गोविंदा इंगळे,. रा.पुर्णबाद नगर,फैजपुर रोड, यावल यांचा रमेश दगडू जोगी.रा.फालकनगर,यावल. तसेच खिलचंद अनिल फेगडे, रा. सुतारवाडा, यावल यांच्या विरुध्दचा तक्रार अर्ज ( आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालयाकडील अहवाल प्राप्त आहे ) या कार्यालयास प्राप्त झालेला आहे.
त्याअर्थी,सदर प्रकरणातील अर्जदार व गैरअर्जदार यांना म्हणणे मांडण्यासाठी व त्या अनुषंगाने लेखी खुलासे.
तद अनुषंगिक दस्तऐवज सादर करणेसाठी या कार्यालयात गुरुवार दि. १३/०८/२०२६ रोजी दुपारी २.३० वाजता सुनावणी ठेवण्यात येत आहे.तरी सदर सुनावणीस आपण स्वतः किवा प्राधिकृत व्यक्ती मार्फत समक्ष आपले लेखी तोंडी म्हणणे सादर करावे.सदर प्रकरणी आपण दिलेल्या तारखेस व विहित वेळेवर उपस्थित न राहिल्यास आपले काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरुन उपलब्ध
कागदपत्रांच्या आधारे उक्त प्रकरणी महाराष्ट्र सावकारी ( नियमन ) अधिनियम २०१४ चे कलम १८ अंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असे सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक धर्मराज पाटील यांनी दिलेल्या सुनावणी नोटीसत नमूद केले आहे सुनावणी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात जिल्हा उपनिबंधक काय निर्णय देतात.? याकडे संपूर्ण यावल शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या