Saturday, February 21, 2026
Homeजळगावभुसावळमध्ये "विशेष अभय योजना 2025" अंतर्गत सिंधी समाजासाठी शिबीर घेण्याची मागणी

भुसावळमध्ये “विशेष अभय योजना 2025” अंतर्गत सिंधी समाजासाठी शिबीर घेण्याची मागणी

भुसावळमध्ये “विशेष अभय योजना 2025” अंतर्गत सिंधी समाजासाठी शिबीर घेण्याची मागणी

भुसावळ    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                 दि २ः
राज्य शासनाच्या 14 जून 2018 व 15 मे 2025 रोजीच्या निर्णयानुसार अधिसूचित क्षेत्रातील सिंधी विस्थापितांचे निवासी व वाणिज्यिक जमिनी शर्तभंगासह नियमन करून त्या फ्री होल्ड करण्यासाठी “विशेष अभय योजना 2025” जाहीर करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर अजय नागराणी,भुसावळ येथील रहिवासी यांनी उपविभागीय अधिकारी (SDO) भुसावळ यांना निवेदन देत विशेष शिबिराचे आयोजन करण्याची मागणी केली आहे.

मा.जिल्हाधिकारी,जळगाव यांच्या 11 सप्टेंबर 2025 रोजीच्या पत्रानुसार,जे नागरिक अद्याप या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत,अशा सिंधी समाजातील लाभार्थ्यांना तातडीने कार्यवाही करून योजना लाभ मिळवून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अजय नागराणी यांनी निवेदनात नमूद केले आहे की,अजूनही अनेक गोरगरीब नागरिक असे आहेत ज्यांना त्यांच्या घराच्या जमिनीचे 7/12 उतारे मिळालेले नाहीत.त्यामुळे अशा नागरिकांसाठी विशेष शिबिर घेण्यात यावे, जेणेकरून त्यांना सुलभतेने योजना लाभ मिळू शकेल.

सदर शिबिर पंतप्रधान सेवा पंधरवडा सुरू असताना आयोजित करण्यात यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

या निवेदनाची प्रत तहसीलदार भुसावळ आणि भूमिअभिलेख उपअधीक्षक,भुसावळ यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.सदर मागणीमुळे सिंधी विस्थापित समाजातील अनेकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्रशासन यावर काय निर्णय घेते,याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या