Friday, September 18, 2026
Homeआरोग्यपावसाळा तोंडाशी; भुसावळमध्ये अद्याप नालेसफाई नाही, नागरिकांमध्ये तीव्र संताप

पावसाळा तोंडाशी; भुसावळमध्ये अद्याप नालेसफाई नाही, नागरिकांमध्ये तीव्र संताप

पावसाळा तोंडाशी; भुसावळमध्ये अद्याप नालेसफाई नाही, नागरिकांमध्ये तीव्र संताप

 

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

शहरात पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अद्यापही मुख्य नाले आणि उपनाल्यांची सफाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मे महिना संपत आला असून मान्सूनपूर्व साफ सफाई  कामे युद्धपातळीवर होणे अपेक्षित असताना शहर प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

शहरातील बाजारातून जाणारा एकमेव मोठा नाला सध्या कचरा, प्लास्टिक, गाळ आणि साचलेल्या घाणीने भरून गेला आहे. अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये अतिक्रमण आणि अरुंद झालेले प्रवाह यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. मुख्य नाल्याला जोडणारे लहान नाले आणि गटारेसुद्धा महिन्यांपासून साफ करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पहिल्याच मुसळधार पावसात शहरातील अनेक भाग जलमय होण्याची भीती व्यक्त होत आहे.

खडका परिसरात तर गटारीचे पाणी जुन्या महमार्गावर येत आहे .

स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोप होत आहे. “ ७२ तासात कचरा उचलू”, “लवकरच सफाई मोहीम सुरू करू” अशा घोषणा करण्यात आल्या; मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही. परिणामी डासांचे प्रमाण वाढत असून दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

 

Oplus_131072

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शहरात सत्तास्थापनेचा राजकीय खेळ सुरू होता. मात्र सत्ता स्थापन झाल्यानंतरही मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. “राजकारणात व्यस्त असलेल्या प्रशासनाला नागरिकांच्या समस्यांचा विसर पडला का?” असा सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

पावसाळ्यापूर्वी तातडीन�

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या