Tuesday, February 17, 2026
Homeगुन्हाएलसीबीची मोठी कामगिरी : खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला काही तासात ठोकल्या बेड्या...

एलसीबीची मोठी कामगिरी : खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला काही तासात ठोकल्या बेड्या !

एलसीबीची मोठी कामगिरी : खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला काही तासात ठोकल्या बेड्या !

जळगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                  विजयादशमी दिवशी रात्रीच्या सुमारास शहरातील कासमवाडी परिसरात ज्ञानेश्वर उर्फ नाना भीकन पाटील (वय-२७) या तरुणावर जुन्या वादातून धारदार कोयत्याने वार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासातच संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.

सविस्तर वृत्त असे कि, एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गंभीर खुनाच्या गुन्ह्यात पाहीजे असलेला मुख्य आरोपी नामे योगेश संतोष पाटील उर्फ पिंटू (वय २७, रा. कासमवाडी, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत नशिराबाद परिसरातून शिताफीने अटक केली. आरोपीस पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. दि. ०३/१०/२०२५ रोजी सीसीटीएनएस गु.र. नं. ७०६/२०२५, भारतीय नवसंहितेतील कलम १०३ अंतर्गत दाखल खुनाच्या गुन्ह्यात आरोपी फरार होता. या प्रकरणाचा तात्काळ तपास करून आरोपीला अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. श्री महेश्वर रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना दिले.

या आदेशानुसार पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोह. नितीन बाविस्कर, पोना. किशोर पाटील, पोकॅ. छगन तायडे, पोकॉ. रविंद्र कापडणे यांच्या पथकाने कामाला सुरुवात केली. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या शिताफीने कारवाईत, नशिराबाद परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
ही यशस्वी कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, तसेच नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस प्रशासनाच्या या तत्पर कारवाईमुळे खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळाले असून, या पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या