Wednesday, March 25, 2026
Homeआरोग्ययेथे महिलांसाठी मोफत योगशिबिर संपन्न

येथे महिलांसाठी मोफत योगशिबिर संपन्न

येथे महिलांसाठी मोफत योगशिबिर संपन्न

वरणगाव          खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              ता भुसावळ दि २ ऑक्टोबर :
मू.जे.महाविद्यालयाच्या ‘सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी’च्या वतीने फुलगाव येथे महिलांसाठी मोफत योगशिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराची सुरुवात दि १७ सप्टेंबर रोजी प्रा.ज्योती वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाली.शिबिराचे समारोप बुधवारी करण्यात आला.

या शिबिराचे आयोजन महिलांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्य वृद्धीसाठी करण्यात आले होते.शिबिराचे संचालनाचे योग प्रशिक्षिका सौ. नयना चौधरी यांनी केले.त्यांनी महिलांना विविध योगासन,प्राणायाम व ध्यान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

दररोज संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत फुलगाव येथील जोगेश्वरी देवी मंदिर हॉलमध्ये हे शिबिर पार पडले.शिबिरामध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.योग विभागाचे संचालक प्रा. डॉ.देवानंद सोनार यांचे शिबिरास मार्गदर्शन लाभले.या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण झाली असून,भविष्यातही असे शिबिर सातत्याने आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या