धर्मरात तायडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी भुसावळ ता. ५ ऑक्टोबर:
धर्मरात विजय तायडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जळगाव जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.ही नियुक्ती पुनर्वसन मंत्री आमदार अनिल पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते करण्यात आली.
या वेळी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या अध्यक्षस्थानी प्रतिभा शिंदे होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते लोक संघर्ष, सावदा तालुक्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, प्रदेश सरचिटणीस रविंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, शहराध्यक्ष संतोष चौधरी (दाढी) तसेच पक्षातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नविन जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल धर्मरात तायडे यांचे अभिनंदन होत असून, पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.