Thursday, October 16, 2025
Homeजळगावनगरपालिका अध्यक्षपदासाठी सुशिक्षित दोन महिलांमध्ये तुल्यबळ लढत होणार..

नगरपालिका अध्यक्षपदासाठी सुशिक्षित दोन महिलांमध्ये तुल्यबळ लढत होणार..

नगरपालिका अध्यक्षपदासाठी सुशिक्षित दोन महिलांमध्ये तुल्यबळ लढत होणार..

न.पा. राखीव सदस्य संख्याबळ लक्षात घेता महिलांची सत्ता राहील.

यावल खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाल्याने सुशिक्षित २ महिलांमध्ये अत्यंत चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण आहे, त्याचप्रमाणे नगरपरिषदेत २३ पैकी १२ महिला सदस्यपद आणि लोकनीयुक्त महिला अध्यक्षपद राखीव झाल्याने नगरपरिषदेत महिलांची सत्ता राहणार आहे.

यावल नगरपरिषदेत राजकीय पक्ष आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार किंवा कसे याबाबत निश्चित नसले तरी नगरपरिषद निवडणुकीत भाजपा समर्थक पॅनलमध्ये सुशिक्षित महिला सौ.निलीमा नितीन महाजन व विरोधी पक्ष किंवा गटातर्फे सुशिक्षित आणि अपक्ष सौ.छायाताई अतुल पाटील यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

सौ.छायाताई पाटील या धूर्त, क्षणाक्ष,समय सुचकता बाळगणारे, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या पत्नी तथा यावल शहरातील विरारनगर,विकसित भागातील महिला मंडळाच्या अध्यक्षा आणि जबाबदार गृहिणी असल्याने सौ.छायाताई पाटील यांना नगरपरिषद निवडणुकीत त्यांच्या पतीच्या राजकीय कार्याचा, अनुभवाचा तसेच सर्व स्तरातील नागरिकांशी असलेल्या दांडगा जनसंपर्काचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणार आहे.यामुळे निवडणुकीत यांच्या विरोधी महिला उमेदवाराच्या समर्थकांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

भारतीय जनता पार्टीतर्फे किंवा पुरस्कृत पॅनल मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी यावल शहरातील प्रख्यात महाजन मेडिकलचे संचालक तथा मालक आणि समाजसेवक यांचा सुद्धा सर्व स्तरात दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांच्या सौभाग्यवती सौ.नीलिमा नितीन महाजन यांचे नाव सध्या शहरात टॉपवर असताना यात लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक उमेश फेगडे यांच्या पत्नी यांनी सुद्धा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपला दावा करून कमरेला पदर खोसला आहे. यात नीलिमा महाजन यांना किंवा रोहिणीताई फेगडे यांच्यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची हे मात्र पक्ष श्रेष्ठीं ठरवणार आहेत आणि यात सामाजिक निर्णय महत्वाचा असला तरी यावल नगरपरिषद लोकनियुक्त अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सौ.नीलिमा महाजन आणि सौ.छायाताई पाटील यांच्यातच खरी सरळ तुल्यबळ लढत होणार असल्याने दोघांच्या राजकीय,सामाजिक दृष्टिकोनाकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष लागून आहे.यावल नगरपालिकेत एकूण २३ सदस्यां पैकी १३ महिला सदस्य राखीव महिला सदस्य निवडून येणार असल्याने महिलां सदस्य व अध्यक्ष मिळून एकूण महिला सदस्यांची संख्या १४ होणार असल्याने नगरपालिकेची सत्ता ही महिलांच्या हाती येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या