Thursday, October 16, 2025
Homeजळगावयेथील तृतीयपंथीयाचा हद्दपारीचा आदेश पारीत जळगांव जिल्ह्यात प्रथमच किन्नरची हद्दपारी

येथील तृतीयपंथीयाचा हद्दपारीचा आदेश पारीत जळगांव जिल्ह्यात प्रथमच किन्नरची हद्दपारी

येथील तृतीयपंथीयाचा हद्दपारीचा आदेश पारीत
जळगांव जिल्ह्यात प्रथमच किन्नरची हद्दपारी

भुसावळ.  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील समता नगर मधील तृतीय पंथीय जितु अलियास उर्फ जितू ज्योती जॉन ,वय ३३ याचा जळगाव जिल्ह्यातून हदपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी पारीत केला आहे .
याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता . तसेच भुसावळ उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया समोर तृतीय पंथीय शमीबा पाटील, आम्रपाली उर्फ अशपाक बागवान व इतरांनी उपोषण सुरू केले होते .
किन्नर जितू काही लोकांच्या सहकार्याने मारहाण करून त्रास देत असून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे तक्रारीत नमूद केले होते .
मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (१) (अ)(ब) अन्वये दिनांक :- ०८/१०/२०२५)
अप्पर पोलिस अधिक्षक, जळगांव यांचेकडील हद्द‌पार प्रस्ताव जावक क्र ना क्र. 2710/स्था.गु.शा/४हणार/०५/२०२५ दि. 09/05/2025 मध्ये दि. ०८/१०/२०२५ रोजी निकालपत्र पारित होऊन आदेश झालेला आहे.
सदर इसमास जळगांव जिल्हयातुन १ वर्षासाठी घालवून देण्यात येत आहे.
जितु अलियास जान उ फे ज्योती जान (तृतीयपंथी) याने हा आदेश मिळाल्याच्या तारखेपासुन तात्काळ रस्ता किंवा रेल्वे मार्गाने जळगांव जिल्हयाच्या हददीतुन 01 वर्ष मुदतीसाठी बाहेर निघून जावे.
जितु अलियास जान उर्फ जितु ज्योती जान याने सदर कालावधीत तो इतरत्र राहील तेथे नजीकच्या पोलिस स्टेशनला महिन्यातुन एकदा राहण्याचा संपुर्ण पत्ता (त्यात बदल झाला नाही तरी) दिला पाहीजे. त्याने जळगांव जिल्हयाच्या हददीत उपविभागीय दंडाधिकारी, भुसावळ यांच्या लेखी परवानगीशिवाय प्रवेश करु नये किंवा परत येवू नये.
आदेश, हददपार इसमास मान्य नसल्यास, या आदेशाच्या दिनांकापासून तीस (३०) दिवसांच्या आत मा, विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांच्याकडे अपील दाखल करता येईल.
पोलिस निरीक्षक बाजारपेठ पोलिस स्टेशन भुसावळ यांनी उपरोक्त हददपार इसमास सदर आदेशाची प्रत तात्काळ बजावून आदेशात नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करावी व तसा अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा असे आदेशात म्हटले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या