आमदार चंद्रकांत पाटील यांची समय सूचकता आणि कार्यतत्परता
अपघातग्रस्ताला दिला धीर !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव येथील एका कार्यक्रमात जाताना मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भुसावळ जवळील साकेगाव येथे सकाळी सकाळी माणुसकी आणि आपुलकी दाखविल्याने संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक केले जात आहे.
साकेगावजवळ एका रिक्षाचा अपघात होऊन ती रस्ता दुभाजकाला धडकून उलटली. यावेळी आमदारांनी वेळ न गमावता स्वतः गाडीतून उतरून अपघातग्रस्त प्रवाशांना रिक्षातून बाहेर काढण्यास मदत केली.त्यांनी अपघातग्रस्त आणि घाबरलेल्या प्रवाशांना धीर दिला.तातडीने रुग्णवाहिका बोलवून जखमींना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. आ.चंद्रकांत पाटील जळगांव येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना साकेगाव (भुसावळ) गावाजवळ एक रिक्षा महामार्गावरील दुभाजकाला धडकली आणि रिक्षा उलटली रिक्षातील प्रवासी आकांताने ओरडतात. अनेक वाहनांची वर्दळ सुरू होती परंतु आ.चंद्रकांत पाटलांनी आपली एकमेव गाडी थांबवली व स्वतः उतरून आ.चंद्रकांत पाटील गाडीतून प्रवाश्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली तातडीने अँब्युलन्स बोलवली.अपघाताने हादरलेल्या प्रवाश्यांना धीर मोठा धीर देऊन मदत कार्य सुरू केले. अलीकडच्या वातावरणात संवेदनशील लोक प्रतिनिधींची फार कमी आहे, अश्या वातावरणात एक विधानसभा सदस्य स्वतः हून अपघाताच्या वेळी लोकांच्या मदतीला धावून येतो आणि त्यातून संवेदनशीलतेचे दाखवून मदत करतो,विधानसभा सदस्याने स्वतः अपघातस्थळी धाव घेऊन केलेली ही मदत नक्कीच कौतुकास्पद ठरली आहे.आ.पाटील यांच्या या कृतीने त्यांच्यातील सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलता, माणुसकी अधोरेखित झाली. या त्यांच्या कार्यतत्परतेचे साकेगाव परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातून कौतूक होत आहे.