Tuesday, February 17, 2026
Homeगुन्हाशहरात गोळीबारात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू : आरोपीवर यापूर्वी झाली होती एमपीडीएची...

शहरात गोळीबारात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू : आरोपीवर यापूर्वी झाली होती एमपीडीएची कारवाई !

शहरात गोळीबारात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू : आरोपीवर यापूर्वी झाली होती एमपीडीएची कारवाई !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – एमआयडीसीमधील जी-सेक्टर परिसरात रविवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास विजेता कंपनीतील कामगार आणि जवळच्या पानटपरी चालकातील वादातून झालेल्या गोळीबारात राजन शेख रफिउल्ला (वय २०, मूळ रा.आझमगड, उत्तरप्रदेश) या जखमीचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी राहुल बहऱ्हाटे याच्यावर यापूर्वी एमपीडीएची कारवाई झाली आहे.

या घटनेच्या निमित्ताने अवैध धंद्यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालत असल्याच्या पूर्वीपासून तक्रारी आहेत. परंतु, त्यांच्यावर ठोस कारवाई होत नाही, त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढल्याचा आरोप जनतेकडून होत असतो. व्यवस्थापक समजावत असतानाच राहुलची पत्नी मोनाली स्कूटरवर त्या ठिकाणी आली. राहुल बन्हाटे पळतच तिच्याकडे गेला आणि तिच्याकडून काहीतरी वस्तू घेऊन परतला. कामगारांना धमकावत त्याने, सरफू अहमद याच्यावर पिस्तूल रोखून गोळीबार केला. राहुल बन्हाटे याचा नेम चुकल्याने गोळी सरफूला न लागता तो तिथून पळून गेला. मात्र, त्यानंतर त्याने फिरोज शेख याच्या पोटावर गोळी मारली, ज्यामुळे फिरोज खाली कोसळला. एवढ्यावरच न थांबता राहुलने राजन शेख याच्याही पोटावर गोळीबार केला. दोघेही खाली कोसळताच राहुल आणि त्याची पत्नी मोनाली घटनास्थळावरून पळून गेले. जखमी दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, त्या ठिकाणी उपचार सुरु असताना सोमवारी दुपारी राजन शेख याचा मृत्यू झाला. या प्रकरणी फरार संशयित आरोप राहुल बऱ्हाटे याच्यावर खुनाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मूळचे उत्तरप्रदेशातील रहिवासी फिरोज शेख, राजन शेख व इतर मित्र विजेता कंपनीत काम करतात. पानटपरी चालक राहुल बन्हाटे हा वारंवार कामगारांना त्रास देत असे. रविवारी रात्री त्याने कामगार सरफू अहमद याला मारहाण केली. याबाबत कंपनीचे व्यवस्थापक मोहम्मद अफजल जलाऊद्दीन उर्फ सोनू यांना सांगण्यात आले. व्यवस्थापक सोनू यांच्यासह फिरोज, राजन, सरफू, सलीम आणि संजय हे सर्व जण राहुलला समजावून सांगण्यासाठी त्याच्या पानटपरीवर गेले. यावेळी राहुलने फोनवर ‘लवकर या, हे सर्व एकत्र आले आहेत,’ असे सांगून इतरांना बोलावले.

संशयित आरोपी राहुल बहाटे याच्यावर काही वर्षांपूर्वी ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी मयत राजन शेख याच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने राहुल बन्हाटे पानटपरीच्या आड गावठी दारुचीही विक्री करायचा असा आरोप केला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या