Thursday, January 29, 2026
Homeजळगावभारतीय जनता पार्टीच्या दूरदृष्टीमुळे मतदारांमध्ये संभ्रम.

भारतीय जनता पार्टीच्या दूरदृष्टीमुळे मतदारांमध्ये संभ्रम.

यावल नगरपरिषद निवडणूक

यावल खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – नगरपरिषद निवडणुकीनिमित्त यावल शहरात दि.९ रोजी महिला राखीव लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी तसेच न.पा.सदस्य पदासाठी प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भारतीय जनता पार्टीतर्फे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे,आमदार अमोल जावळे,जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आल्याने तसेच महिला राखीव नगराध्यक्ष पदासाठी आतापर्यंत ज्या ३ ते ४ प्रबळ इच्छुक महिला उमेदवार होत्या त्या ऐवजी इतर आणखी काही महिला उमेदवार इच्छुक झाल्याने भारतीय जनता पार्टीने फार दूरचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गेल्या दोन महिन्यापासून चर्चेत असलेल्या इच्छुक महिला उमेदवारांना डावलून नवीन महिला उमेदवारास उमेदवारी देण्याबाबत जामनेर, भुसावळ,यावल येथून जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्याने मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे.
 शहरात सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे आणि सतत जनसंपर्कात असणारे समाजसेवक,व्यापारी,पदाधिकारी यांच्या पत्नी तथा सामाजिक, राजकीय दृष्ट्या प्रबळ असणाऱ्या ३ ते ४ गृहिणीचे लोकनियुक्त महिला अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत होते आणि आजही आहे.परंतु यावल, फैजपूर, सावदा, रावेर या केळी उत्पादक पट्ट्यात तथा मतदारसंघात आपले खास वर्चस्व राहण्यासाठी तसेच पुढील पंचवार्षिक लोकसभा,विधानसभा निवडणुका लक्षात घेता ठराविक उमेदवारांना पोषक असे राजकीय वातावरण निर्मितीसाठी डायरेक्ट जामनेर,भुसावळ मार्गे यावल शहरात भारतीय जनता पार्टीला पोषक असे राजकीय वातावरण निर्मितीसाठी यावल नगरपरिषद लोकनियुक्त महिला राखीव अध्यक्ष पदासाठी लोकांच्या मनात आणि चर्चेत असलेल्या महिला उमेदवारांना डावलून ऐन वेळेला दुसऱ्या महिलेस उमेदवारी देण्याचा घाट रचला गेल्याने मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
याबाबत मात्र रावेर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे तरुण तडफदार आमदार अमोल जावळे यांना राजकीय क्षेत्रातील डावपेच, निवडणुकीतील रणनीतीचा फारसा, दांडगा अनुभव नसल्याने त्यांना आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीच्या बाहेर जाता येणार नसले तरी यावल न.पा.त.महिला अध्यक्ष पदासाठी निवड करताना यावल शहराच्या सामाजिक,राजकीय भवितव्याच्या दृष्टिकोनातून मतदारांच्या मनातील प्रबळ अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार दिल्यास योग्य राहील अशी चर्चा संपूर्ण यावल शहरात आहे.
याचप्रमाणे यावल न.पा. कार्यक्षेत्रातील प्रत्येक प्रभागात भारतीय जनता पार्टी तुल्यबळ प्रबळ कोणकोणत्या महिला,पुरुष उमेदवारांना उमेदवारी देतात याकडे तसेच प्रत्येक प्रभागातून अपक्ष आणि इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे इच्छुक उमेदवार कोण कोण राहतील.? याकडे मतदारांचे लक्ष वेधून आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या