Thursday, January 29, 2026
Homeजळगाववरणगावमध्ये भाजपचे दोन गट नगरपालिकेच्या निवडणुकीत पेच

वरणगावमध्ये भाजपचे दोन गट नगरपालिकेच्या निवडणुकीत पेच

वरणगावमध्ये भाजपचे दोन गट नगरपालिकेच्या निवडणुकीत पेच

वरणगाव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – आगामी नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरणगाव शहरात भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. पक्षाचे दोन प्रमुख गट तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील गट व माजी नगराध्यक्ष सुनिल काळे गट आमनेसामने आले असून, यामुळे निवडणुकीत मोठा पेच निर्माण झाला आहे. दोन्ही नेत्यांची स्वतंत्र कार्यालये असून, त्यांच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसत आहे.
भाजप कडून नगराध्यक्ष पदासाठी सुनिल काळे व शामल झांबरे या दोघांची नावे चर्चेत आहेत. मंत्री संजय सावकारे यांच्या गटाकडून शामल झांबरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा असून, काळे गटाकडून सुनिल काळे माघार घेण्यास तयार नसल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे दोन्ही गटांनी स्वतंत्र पॅनलची तयारी सुरू केली आहे. मुलाखतीनंतर नविन पॅनल जाहीर होण्याची शक्यता आहे.भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नगरसेवक पदासाठी तसेच नगराध्यक्ष पदासाठी तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांनी पक्ष नेतृत्वाशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.यापैकी एक गट अतिशय सक्रिय असून कार्यकर्त्यांमध्ये त्यांची चांगली पकड आहे, तर दुसऱ्या गटाकडून इच्छुकांची संख्या तुलनेने कमी होत असल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे. मात्र दोन्ही गटांमध्ये तिकीट वाटपावरून संघर्षाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडूनही निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. या पक्षांतही काही इच्छुकांनी उमेदवारी दाखल करण्याची इच्छा व्यक्त केली असून, मात्र त्यांच्या नावांची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या पक्षांत नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.वरणगाव शहरातील जनतेमध्येही निवडणुकीबाबत चांगली चर्चा रंगली आहे. “या वेळी नगरपरिषद कोणाच्या ताब्यात येणार?” हा प्रश्न सर्वत्र चर्चेत आहे. शहरातील विविध भागांत, चहाच्या टपऱ्यांपासून बाजारपेठांपर्यंत सर्वत्र निवडणुकीचीच चर्चा सुरू आहे.नगराध्यक्ष पदासाठीही पाच ते सहा संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत असून, येत्या काही दिवसांत पक्षांमधील रणनीती आणि उमेदवारांची अधिकृत घोषणा झाल्यानंतर निवडणुकीची रंगत अधिक वाढणार आहे.
राजकीय समीकरणे, कार्यकर्त्यांची हालचाल, आणि गटबाजी यामुळे वरणगाव नगरपरिषद निवडणूक अत्यंत रंगतदार आणि चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
नगराध्यक्ष पदासाठीही पाच ते सहा संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत असून, येत्या काही दिवसांत पक्षांमधील रणनीती आणि उमेदवारांची अधिकृत घोषणा झाल्यानंतर निवडणुकीची रंगत अधिक वाढणार आहे.दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) यांनी महाविकास आघाडीसोबत सन्मानाने लढण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस व कॉग्रेस कडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. यात राष्ट्रवादी कडून स्वबळावर लढणार असल्याचे संकेत आधीच दिले होते .
भाजपच्या अंतर्गत चर्चेनुसार, या निवडणुकीत काही माजी नगरसेवकांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाराजी नाट्य उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या वरणगाव भाजपमध्ये गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण असून, वरिष्ठ नेते याकडे दुर्लक्ष करत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.स्थानिक राजकारणातील या घडामोडींमुळे वरणगाव नगरपालिकेची निवडणूक अत्यंत रंगतदार आणि चुरशीची होण्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या