शरद पवार गटाला मोठा धक्का : दिग्गज नेते अजित पवार गटात दाखल !
चोपडा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – राज्यात स्थानिक निवडणुकीची धामधूम सुरु असताना आता जळगाव जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी समर्थक व पदाधिकाऱ्यांसह मुंबई येथे मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, धनंजय मुंडे, आमदार अनिल पाटील, माजी आमदार कैलास पाटील, सूरज चव्हाण, आनंद परांजपे, प्रतिभा शिंदे, जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे जिल्हाध्यक्ष संजय पवार उपस्थित होते. यावेळी चोसाका माजी अध्यक्ष अॅड. घनश्याम पाटील, जि. प. च्या माजी सदस्या इंदिरा पाटील, चोपडा पीपल्स बँकेचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, उद्योजक सुनील जैन, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, चोसाका संचालक शशिकांत देवरे, माजी सभापती कांतीलाल पाटील, कल्पना पाटील, सूतगिरणी उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, माजी नगरसेवक भूपेंद्र गुजराथी, विनायक पाटील, शेतकी संघ अध्यक्ष सुनील पाटील उपस्थित होते.

