सी ई ओ मीनल करनवाल यांची साकेगाव येथे भेट
शाळा व ग्रापं ची केली पाहणी
भुसावळ. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
-तालुक्यातील नेहमीच विविध विषया बाबत चर्चेत असलेल्या साकेगाव येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी भेट दिली यावेळी काही नागरिकांनी समस्यांचा पाळा त्यांच्यासमोर वाचला , ग्रामपंचायतच्या कामाचा दर ८ दिवसाचा आढावा पाठवावा असे सक्तीची सूचना करनवाल यांनी ग्राम विकास अधिकारी विजय सातव यांना केली असुन जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामस्थांना मोफत नळ कनेक्शन देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत .

दरम्यान करनवाल साकेगाव ग्रामपंचायत ला भेट देणार असल्याची वार्ता एक दिवस आधीच सोशल मीडियावर पोहचल्यामुळे ठिकठिकाणी आधीच स्वच्छता करण्यात आली होती असे समजते , तरी करनवाल मॅडम येताच त्यांनी काही विरोधी सदस्य व नागरिकांनी गावातील स्वच्छते समस्यांचा पाढा करणवाल यांच्यासमोर मांडला.
जल जीवन मिशन योजनेअंतर्ग नागरिकांना नळ कनेक्शन मोफत देण्याच्या त्यांनी सूचना केल्या याशिवाय त्यांनी ग्राम ग्रामपंचायत किती कर्मचारी काम करतात? त्यांच्या पगार किती दिला जातो? आदिची माहिती घेतली याशिवाय गावात होणाऱ्या निधीचा खर्च कसा केला जातो , याचाही आढावा घेतला.

15 वित्त आयोग तसेच ग्रामनिधीतून दिव्यांगसाठी तसेच बालकल्याण अर्थात अंगणवाडीसाठी किती खर्च करण्यात आला याचा हिशोबाचा तपशील ही त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला विचारले व त्याची सविस्तर माहिती त्वरित पाठवावी अशी सूचना देखील केली
करनवाल यांचा ताफा गावाची माहिती घेतल्यानंतर जिल्हा परिषद शाळेकडे वळला त्यांनी मराठी जि प मराठी शाळेत भेट देत मुलांशी हितगुज सादात नियमित अभ्यास करण्याच्या सूचना केल्या तसेच शालेय परिसर स्वच्छ ठेवण्याचे ही सूचना त्यांनी यावेळी केल्या .

विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणारा शालेय पोषण आहाराचा दर्जा कसा ?याबाबत माहिती जाणून घेत चक्क शालेय पोषण आहाराचा त्यांनी स्वाद घेतला तसेच शालेय परिसरामध्ये होणाऱ्या चोऱ्या व नको ते प्रकार थांबवण्यासाठी येथे कर्मचारी साफसफाईसाठी ठेवण्याच्या ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना देखील केल्या आहेत .
आठ दिवसांनी आढावा पाठविण्याची सुचना त्यांनी दिली आहे .
प्रसंगी गटविकास अधिकारी डी.जी जाधव विस्तार अधिकारी डी आर जयकार, गौतम वाडे, ग्रामविकास अधिकारी विजय सातव ,सरपंच सचिन सपकाळे ग्रा प सदस्य शकील पटेल, आनंद ठाकरे, अशोक कोळी, धनराज भोई ,संतोष पाटील तसेच राजू भोळे व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

