माजी आमदारांचा निर्णय भाजपच्या पथ्यावर पडणार का..?
यावल खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – यावल नगरपरिषद लोकनियुक्त महिला अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीचे माजी आमदार रमेश चौधरी आणि शिरीष चौधरी यांनी घेतलेला निर्णय भाजपाच्या पथ्यावर पडणार आहे की महाविकास आघाडीच्या दृष्टीने योग्य ठरणार आहे याबाबत मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असल्याची चर्चा संपूर्ण यावल शहरासह तालुक्यात आहे.
यावल शहरात मुस्लिम मतदार बांधवांची संख्या अंदाजे १४ हजार आणि हिंदू मतदार बांधवांची संख्या १८ हजार अशी एकूण मतदार ३२ हजार मतदार संख्या आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची व इतर मित्र पक्षाची महाविकास आघाडी असली तरी मतदार संख्या आणि मुस्लिम बांधवांचे आवडते चिन्ह पंजा लक्षात घेता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस माजी आमदार रमेश चौधरी आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांनी महाविकास आघाडी तर्फे उमेदवार निश्चित करताना पंजा या निशाणीवर महिला उमेदवारी जाहीर करायला पाहिजे परंतु दोघं माजी आमदारांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करताना मशाल या चिन्हाला प्राधान्य दिल्याने निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीने जाहीर केलेले मशाल चिन्ह भाजपाच्या पथ्यावर पडणार की महाविकास आघाडीला पोषक ठरणार याकडे संपूर्ण यावल शहरासह तालुक्याचे लक्ष लागून आहे.यावल नगरपरिषद निवडणुकीत पाच ते सहा प्रभागांमध्ये उमेदवारी दाखल केलेले उमेदवार हे प्रहार पक्षातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश करून पंजा या निशाणीवर आणि काही शिवसेना उभाठा मशाल या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दोघं माजी आमदारांनी म्हणजे महाविकास आघाडी तर्फे निर्णय घेताना पंजा या चिन्हाला प्राधान्य देऊन महिला अध्यक्षपदासाठी उमेदवार जाहीर करायला पाहिजे होते परंतु तसे न करता त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला म्हणजे मशाल चिन्हाला प्राधान्य दिल्याने मुस्लिम समाजाच्या मतदानावर विपरीत परिणाम होऊ शकतो या कारणांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष शेखर पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष यांच्याकडे दिला यानंतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दोघं माजी आमदारांनी यावल नगरपरिषद महिला अध्यक्ष पदासाठी घेतलेला निर्णय भारतीय जनता पार्टीच्या पथ्यावर पडणार की..? महाविकास आघाडीच्या निर्णय योग्य ठरणार आहे किंवा नाही..? याकडे संपूर्ण यावल शहरासह तालुक्याचे लक्ष वेधून आहे.