Friday, March 13, 2026
Homeजळगावदत्त जयंतीनिमित्त विविध ठिकाणी भक्तिमय उत्सव; स्वामी समर्थ सप्ताहाची भव्य सांगता !

दत्त जयंतीनिमित्त विविध ठिकाणी भक्तिमय उत्सव; स्वामी समर्थ सप्ताहाची भव्य सांगता !

दत्त जयंतीनिमित्त विविध ठिकाणी भक्तिमय उत्सव; स्वामी समर्थ सप्ताहाची भव्य सांगता !

मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – मुक्ताईनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, जुने गाव येथे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आज्ञा व आशीर्वादाने दत्त जयंती निमित्त २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान अखंड नामजप, यज्ञ–याग, प्रहारे व सामूहिक गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते.

२८ नोव्हेंबर रोजी सप्ताहाला सुरुवात झाली असून आज सप्ताहाची भक्तिमय सांगता करण्यात आली.सप्ताहकाळात दररोज सकाळी भूपाळी आरतीनंतर सामूहिक गुरुचरित्र पारायण, साडेदहा वाजता नैवेद्य आरती, तसेच गणेश याग, मनोबोध याग, स्वामी याग, गीताई याग, श्री चंडी याग, मल्हारी व रुद्र याग अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन झाले. आज दुपारी १२.३९ वाजता नित्य स्वाहाकार, बळी पूर्णाहुती आणि दत्त जन्मोत्सव महाआरतीने वातावरण भक्तिमय झाले. उद्या सत्यदत्त पूजन व देवता विसर्जनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. सप्ताहादरम्यान मोठ्या संख्येने भक्तांनी आरती व प्रसादाचा लाभ

 

घेतला.समाप्तीच्या दिवशी सेवेकऱ्यांच्या घरून आणलेल्या जेवणाच्या डब्यांचा नैवेद्य दाखवून मांदियाळी करण्याची सुंदर परंपरा देखील यंदा उत्साहात पार पडली. गुरुचरित्र वाचनासाठी एकूण ११६ महिला-पुरुष सेवेकरी बसले होते. प्रहर सेवेत सकाळी ७ ते सायं ७ महिला वर्ग तर रात्री ७ ते सकाळी ७ पुरुष भक्त प्रहर देत होते. सर्व सेवेकऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन सप्ताह यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या