Saturday, January 24, 2026
Homeजळगावकथित सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणचे "पत्र्याचे सेट काढून घ्या

कथित सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणचे “पत्र्याचे सेट काढून घ्या

कथित सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणचे “पत्र्याचे सेट काढून घ्या
एका मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्यांने दिली तंबी…!

भुसावळ.       खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            दि.७
राज्याचे वस्त्रोदयोग मंत्री सावकारे यांच्या भुसावळ जंक्शन शहरात जामनेर रोडवरील स्टेट बँक जवळ ( सिंधी कॉलनी ) कृष्णलीला हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या ,महिला पुरुषांच्या सार्वजनिक शौचालयाचे प्रवेशद्वार पत्राच्या शेडने बंद केले आहे,ते पत्री शेड / गेट तात्काळ काढून घ्या.. अशी एका राजकीय पदाधिकाऱ्याने संबंधित व्यक्तीला तंबी दिल्याची चर्चा भुसावळ शहरात सुरू झाली आहे.

 


सार्वजनिक शौचालयाची जागा हडप करणाऱ्या व्यक्तीला एका राजकीय पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्याने पत्री शेड तथा गेट काढून टाकण्याची चांगलीच तंबी दिली तरी सुद्धा जागा हडप करणाऱ्या व्यक्तीने पदाधिकाऱ्याच्या सूचनेकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे.जागा हडप करणारा हा एक माफीया असल्याची सूर सुद्धा शहरात आहे.
शौचालयाचे गेट बंद करणाऱ्या म्हणजे जागा हडप करणारी व्यक्ती आणि तंबी देणाऱ्या व्यक्तींचे काही हितसंबंध आहे का.? आणि त्यामुळे तो ते पत्री शेड काढत नाही .
याबाबत सुद्धा त्या परिसरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत .नेमके या चुकीच्या प्रकाराला खतपाणी कोण घालत आहे ? याचाही शोध घेणे आवश्यक आहे . संपूर्ण भुसावळ शहरात याबाबत चर्चे ला उधाण आलेले दिसून आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या