Monday, July 6, 2026
Homeजळगावजळगाव एमआयडीसीतील 'साई किसान' ठिबक कंपनीला भीषण आग: लाखोंचे नुकसान

जळगाव एमआयडीसीतील ‘साई किसान’ ठिबक कंपनीला भीषण आग: लाखोंचे नुकसान

जळगाव एमआयडीसीतील ‘साई किसान’ ठिबक कंपनीला भीषण आग: लाखोंचे नुकसान

Oplus_131072

<img class

जळगाव    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी    एमआयडीसी परिसरातील सेक्टर K मधील साई किसान ठिबक कंपनीला बुधवारी, १० डिसेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
आग लागताच काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण कंपनी धुराच्या लोटाने वेढली गेली. परिसरातील नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली.

माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी कोणतीही वेळ न दवडता, शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

 


या भीषण दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीमुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, लाखो रुपयांचे साहित्य व मालमत्ता जळून खाक झाली आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, याबाबत अधिक तपासणी सुरू आहे.

ठिबक कंपनी असल्याने आगीमुळे प्लास्टिक आणि इतर ज्वलनशील वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या