पेट्रोल पंप आवारातील टॉयलेट सर्व जनतेसाठी खुले ठेवले पाहिजेत…… केरळ हाय कोर्ट
यावल. खानदेश ला इंग्लिश प्रतिनिधी दि.१५
राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व किरकोळ विक्री केंद्रांच्या बाबतीत, तेल विपणन कंपन्या आणि याचिकाकर्ते जनतेला २४ तास स्वच्छतागृहांच्या सुविधा वापरण्याची परवानगी देतील आणि परिशिष्ट R1 ( b ) परिपत्रकानुसार पाणी व स्वच्छतागृहांच्या सुविधा उपलब्ध असल्याची माहिती देणारा फलक किरकोळ विक्री केंद्रांच्या प्रवेशद्वारावर लावतील.
(ii) राष्ट्रीय महामार्गांव्यतिरिक्त इतर ठिकाणी असलेल्या किरकोळ विक्री केंद्रांच्या बाबतीत,तेल विपणन कंपन्या आणि याचिकाकर्ते ग्राहक आणि प्रवाशांना २४ तास स्वच्छतागृहांच्या सुविधा वापरण्याची परवानगी देतील.
सामान्य प्रवाशांना / जनतेलाही किरकोळ विक्री केंद्रांमधील स्वच्छतागृहांच्या सुविधा वापरण्याची परवानगी देतील, मात्र विक्रेत्याच्या समाधानार्थ सुरक्षा नियमांचे पालन करणे अनिवार्य असेल.
ग्राहकांनी सर्व पेट्रोल पंपावर आलेले अनुभव X तसेच फेसबुक आणि व्हॉटसॲपवर शेअर करून त्यात पेट्रोलियम मिनिस्टर, पीएमओ यांच्यासह आमच्या संस्थेला abgpindia टॅग करावे.
असे अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ६३४,सदाशिव पेठ,पुणे ४११०३० यांनी जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्धी केली आहे.

