चाळीसगाव येथे जळगाव येथील अवैध मद्यविक्रीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
२.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक

जळगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि 20
नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यनिर्मिती व विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत जळगाव जिल्ह्यातून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. चाळीसगाव तालुक्यातील अलवाडी येथे छापा टाकून अवैधरित्या साठवलेले व विक्रीसाठी ठेवलेले विदेशी मद्य जप्त करण्यात आले असून एकास अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त श्री. प्रसाद सुर्वे, उपआयुक्त (नाशिक विभाग) श्रीमती यू. आर. वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अधीक्षकांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. निरीक्षक अशोक तारू यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कारवाई केली. छाप्यात महाराष्ट्र राज्यात विक्रीस मनाई असलेले तसेच बनावट लेबल लावलेले विदेशी मद्य, रेडीमेड लेबल्स व इतर साहित्य असा एकूण २ लाख ५५ हजार ६६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी इसम गौतम गरुड (वय ३३, रा. अलवाडी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यास अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. निरीक्षक अशोक तारू निरीक्षक भरारी पथक राज्य उत्पादन शुल्क जळगाव के. इन. गायकवाड, निरीक्षक रा. उ. शु. चाळीसगाव व् जवान श्री व्हि बि परदेशी, दुय्यम निरीक्षक वाय्. वाय. सूर्यवंशी व सहकारी स्टाफ आर .पी. सोनावणे.इन. बी. पवार, नरेंद्र पाटील,विठ्ठल हटकर , पूनम पाटील व वाहन चालक आर. टी. सोनावणे अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोलफ्री क्रमांक १८००-२३३-९९९९ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

