यावल नगरपरिषद लोकनियुक्त महिला अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी कडून भाजपाचा दारुण पराभव.
न. प. सदस्य २३ जागांपैकी भाजपला ८ , राष्ट्रवादी ३ , भा.रा.काँ. ६ , अपक्ष ४ , उबाठा २
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२१ नगर परिषद सार्वत्रिक लोकनियुक्त महिला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या छाया अतुल पाटील यांनी १४ हजार १०६ मताधिक्य घेऊन भाजपाच्या उमेदवार रोहिणी फेगडे ( ९ हजार ५६ मते ) यांचा ५ हजार ४० मतांनी दारुण पराभव केला.
नगरपरिषद एकूण २३ सदस्यांपैकी भाजपा ८, राष्ट्रवादी काँग्रेस ३ ( अजित पवार गट ),भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६ , अपक्ष ४ , उबाठा २ सदस्य निवडून आले.
विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे प्रभाग क्र. २ अ मधून रुबाब महंमद तडवी,(११९२ ), प्र. क्र. ७ अ मधून कल्पना दिलीप वाणी (९४४ ), प्र. ९ अ मधून राकेश मुरलीधर कोलते(१३९७). प्र. क्र.१० अ मधून योगेश विजय चौधरी(७०७), प्रभाग क्र. १० ब मधून सौ.नंदा राजेंद्र महाजन( १३००), प्र. क्र.११ ‘ अ’ मधून सविता विजय नन्नवरे (२१२८), प्र. क्र. ११ ‘ब’ हेमराज जगन्नाथ फेगडे (१७२० ), प्रभाग क्र. ११ ‘ क’ मधून यवले शुभांगी रोशन(१३६४)
अपक्ष सदस्य म्हणून प्र. क्र.१ अ मधून सोनवणे शीला श्रीधर (५७९), प्र. क्र. ३ ब मधून खान इमाम रजा समीरखान (१३५५), प्र.क्र.६ ब मधून कच्छी करीम कासम ( १०९८ ) प्र.क्र.७ ब म्हणून पराग विजय सराफ ( ८७६ ) मते घेऊन विजयी.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून प्रभाग क्र. ३ अ मधून शेख शाहीनाबो शेख रज्जाक (९१०),
प्र. क्र.४ अ मधून भालेराव शालुबाई भालचंद्र (११७२), प्र. क्र.४ ब मधून कमरुन्निसा बी
सैंफुद्दीन ( १०८५ ), प्र. क्र.५ अ मधून शे.निसार हमीद(८२२), प्र. क्र. ५ ब मधून सईदा बी मोहम्मद याकूब ( १०९२ ), प्र. क्र.६ अ मधून कच्छी रुबीना बी उमर कच्छी ( १५८० ) मते घेऊन विजयी झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडून प्र. क्र.१ ब मधून खान अमेनाबी शाकीर ( ७०२ ), प्र. क्र. २ ब मधून खान अंजुम बी कदीर ( १२८० ), प्र. क्र.९ ‘ अ’ मधून वर्षा नीरज चोपडे ( ११७४ ) मते घेऊन विजयी झाले.
महाविकास आघाडी उबाठा तर्फे प्र. क्र. ८ ‘ अ’ मधून बारी वैशाली निलेश बहुमताने निवडून आल्या. तसेच प्र.क्र.८ ‘ ब’ मधून सागर कुमार सुनील चौधरी ( १६२६ ) मताधिक्य घेऊन विजयी झाले.
यावल नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी लोकनियुक्त महिला अध्यक्ष पदाचा उमेदवार वेळेवर निश्चित न केल्याने तसेच निवडणुकीचे नियोजन,निर्णय स्थानिक पदाधिकारी यांना विश्वासात न घेता बाहेरगावच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्व देऊन काही निर्णय घेतल्याने आणि भारतीय जनता पार्टी नेहमीप्रमाणे आपले विविध उपक्रम कार्यक्रम संदर्भातील माहिती ही फक्त पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या व्हाट्सअप,फेसबुक माध्यमातून प्रसिद्ध करीत असल्याने ७५ टक्के पक्षाचे उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने त्याचा विपरीत परिणाम निवडणुकीत झाल्याची चर्चा यावल शहरात आहे.
प्रभाग क्रमांक ७ ब मध्ये भारतीय जनता पार्टीचा तसेच आरएसएसचा कट्टर समर्थक, सक्रिय असलेल्या कार्यकर्त्याला कार्यकर्त्याला भाजपाने तिकीट न देता दुसऱ्या महिला उमेदवाराला उमेदवारी दिलेली त्या ठिकाणी अपक्ष म्हणून भाजपाचा कट्टर कार्यकर्ता निवडून आल्याने याबाबत भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी आत्मचिंतन करायला पाहिजे.
त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक दोन मध्ये भारतीय जनता पार्टीने नको त्या व्यक्तीला महत्त्व दिल्याने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार वंदना भूषण फेगडे यांचा पराभव झाला.

अशाप्रकारे इतर प्रभागात सुद्धा काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीने प्रभागातील उमेदवार यांचा वैयक्तिक स्वार्थ आणि नागरिकांच्या भावना,अपेक्षा लक्षात न घेता उमेदवार दिल्याने त्यांना त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला अशी सुद्धा चर्चा संपूर्ण यावल शहरात आहे.
भाजपाच्या तीव्र विचारधारेला सडेतोड उत्तर…..
धीरज चौधरी.
सकाळी दहा वाजता जिल्ह्यात भाजपाच्या बहुतांश नेत्यांनी टीका-टिपणी अशाप्रकारे केली होती की महाविकास आघाडी एक खाते सुद्धा उघडणार नाही परंतु यावल नगरपरिषद लोकनियुक्त महिला अध्यक्ष छाया अतुल पाटील या पाच हजाराच्या मताधिक्याने निवडून आल्या आणि भाजपाच्या महिला उमेदवार यांचा दारुण पराभव केला हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधासाठी नाही तर जनतेसाठी दिलेले एक सडेतोड उत्तर भारतीय जनता पार्टीला आहे. अशी प्रतिक्रिया रावेर विधानसभेचे भावी आमदार आणि लोकप्रिय युवा नेतृत्व धनंजय चौधरी यांनी दिली.

