Thursday, January 29, 2026
Homeक्रीडाक्रीडा महोत्सव कार्यक्रम निमित्त फिरते स्वच्छतागृह धार्मिक स्थळावर लावल्याने केंद्रीय राज्यमंत्री खडसे...

क्रीडा महोत्सव कार्यक्रम निमित्त फिरते स्वच्छतागृह धार्मिक स्थळावर लावल्याने केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांच्याबाबत भाविकांमध्ये तीव्र नाराजी.

क्रीडा महोत्सव कार्यक्रम निमित्त फिरते स्वच्छतागृह धार्मिक स्थळावर लावल्याने केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांच्याबाबत भाविकांमध्ये तीव्र नाराजी.

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – केंद्रीय राज्यमंत्री,युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय तथा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या पुढाकारातून रावेर लोकसभा क्षेत्रातील युवक-युवतींमध्ये क्रीडासंस्कृती वृद्धिंगत व्हावी तसेच त्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने दि. २३ ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत “खासदार क्रीडा महोत्सव २०२५ खेलो रावेर या भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन भुसावळ येथे करण्यात आले परंतु या कार्यक्रमात सहभागी खेळाडूंसाठी आणलेले फिरते स्वच्छता गृह हे पुरातन जागृत शिवदत्त मंदीरा जवळ / धार्मिक स्थळाजवळ उभी केल्याने / लावल्याने भाविका मध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत संपूर्ण भुसावळ शहरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या जागृत मंदीरात शेकडो भाविक दररोज सकाळ संध्याकाळ पुजा व दर्शना साठी येत असतात परंतु स्पर्धा आयोजकांनी मंदीराच्या जवळच स्वच्छता गृह लावल्याने मंदीर पावित्र्याचा भंग होवु शकतो अशी भाविकांत नागरिकांमध्ये चर्चा आहे .
या क्रीडा महोत्सवाचा भव्य शुभारंभ सेंट्रल रेल्वे ग्राउंड, भुसावळ येथे मंगळवार रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या प्रसंगी आ.चैनसुख संचेती, अमोल हरीभाऊ जावळे,तसेच नंदकिशोर महाजन,अशोक कांडेलकर,डॉ.केतकी पाटील, गोविंद अग्रवाल,हिरालाल चौधरी, विलास चौधरी,किरण कोलते, परिक्षित बऱ्हाटे, मुरलिधर (गोलू) पाटील, सुनिल महाजन, राजन लासूरकर, हरलाल कोळी, मोहन महाजन,जिल्हा क्रीडा अधिकारी जळगांव रविंद्र नाईक व जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा लक्ष्मी शंकर यादव यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, क्रीडाप्रेमी व मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित असले तरी हा कार्यक्रम केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याने संपूर्ण भुसावळ शहरात त्यांच्याविषयी किंवा नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मा. श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रावेर लोकसभा क्षेत्रातील खेळाडूंनी या क्रीडा महोत्सवातून आपली गुणवत्ता सिद्ध करून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी गौरव मिळवावा, अशी इच्छा व्यक्त केली. युवकांनी क्रीडा क्षेत्रात करिअर घडवावे, यासाठी केंद्र सरकार व क्रीडा मंत्रालय मार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले .हा क्रीडा महोत्सव युवकांमध्ये आरोग्य, शिस्त, संघभावना व स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करण्यास निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या