नगर परिषदेत महाविकास आघाडीच्या लोकनियुक्त अध्यक्षाकडे बहुमत राहील ; भाजप गटनेता कोण..?
सौ छाया पाटील अध्यक्षपदाचा पदभार सोमवारी स्वीकारणार.
यावल खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – नगरपरिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचे संख्याबळ लक्षात घेता महाविकास आघाडीतर्फे उबाठा पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.छाया अतुल पाटील यांच्याकडे बहुमत राहणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.आणि यात अपक्ष,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,उबाठा या सदस्यांचे सर्वानुमते एक किंवा दोन गट नोंदणी होऊ शकतात त्याचप्रमाणे भाजपाची गट नोंदणी करताना मात्र भाजपला गटनेता निवड करताना महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार असला तरी यावल नगर परिषद अध्यक्षपदाचा पदभार लोकनियुक्त अध्यक्षा सौ.छाया पाटील सोमवारी स्वीकारणार आहे.
यावल नगर परिषदेत नवनिर्वाचित लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा महाविकास आघाडीतर्फे ( उभाठाच्या ) सौ.छाया पाटील आहेत.नवनिर्वाचित सदस्यांमध्ये उबाठाचे सागरकुमार सुनील चौधरी वैशाली निलेश बारी.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शेख निसार हमीद,शेख शाहीन बानो शेख रज्जाक, शालुबाई भालचंद्र भालेराव, कमरुन्नीसा बी.सैफुद्दीन,सईदा बी मोहम्मद याकूब.कच्छी रुबीना बी उमर कच्छी.तर अपक्ष म्हणून शीला श्रीधर सोनवणे,खान इमाम रजा समीर खान,कच्छी करीम कासम,पराग विजय सराफ.या १३ नवनिर्वाचित सदस्यांची दोन किंवा एक गट होऊ शकतात.तसेच भाजपाचे सौ.कल्पना दिलीप वाणी,सौ.नंदा राजेंद्र महाजन,सौ. सविता विजय ननवरे,सौ.शुभांगी रोशन यवले,रुबाब महंमद तडवी, राकेश मुरलीधर कोलते,योगेश विजय चौधरी,हेमराज जगन्नाथ फेगडे या एकूण ८ नवनिर्वाचित भाजप सदस्यांचा एक गट,आणि या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवनिर्वाचित सदस्य खान अमेनाबी शाकीर,खान अंजुमी कदीर,सौ.वर्षा नीरज चोपडे या तीन सदस्यांचा एक वेगळा गट तयार होतो किंवा नाही किंवा ते भारतीय जनता पार्टीच्या गटात सामील होतात याकडे संपूर्ण यावल शहराचे लक्ष लागून आहे.

