जे.ई.स्कूल, मुक्ताईनगरची शैक्षणिक सहल संपन्न… : विद्यार्थ्यांनी सर केले ऐतिहासिक गड किल्ले…
मुक्ताईनगर — खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी विद्यार्थ्यांना ऐतिहासिक भौगोलिक स्थळांची माहिती व ओळख व्हावी यासाठी शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते तसाच अनुभव मुक्ताईनगर येथील जे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक गड किल्ले सर करून ऐतिहासिक व भौगोलिक स्थळांची प्रत्यक्ष पाहणी केली. ही शैक्षणिक सहल अतिशय आनंददायी वातावरणात संपन्न झाली.
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित जे.ई.स्कूलची दिनांक 21 डिसेंबर ते 24 डिसेंबर पर्यंत शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते.मोरगाव, जेजुरी,नारायणपूर,प्रति बालाजी, आळंदी, लेण्याद्री, शिवनेरी, ओझर,शिर्डी या ठिकाणी नेण्याचे आयोजिले होते. विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल, संस्कृती व कला यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा. या हेतूने नियोजन करून राबविण्यात आली. ऐतिहासिक व सांस्कृतिक ठिकाणांना भेट देण्यात आली. सहलीच्या बसचे पूजन मुख्याध्यापक व्ही.एम.चौधरी यांच्या उपस्थितीत करून रवाना झाली. शैक्षणिक सहलीसाठी बी.पी.लोखंडे, आर.एन. बढे, एस.एस. धनके, श्रीमती ए.डी.भोळे यांनी सहकार्य करून सहल यशस्वीपणे पार पाडली. तर एस.टी. महामंडळाचे चालक एस.पी.नारखेडे यांनी सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतूक सेवा पुरवली.

