पोलीस स्टेशन समोर कचरा ढिग,आणि तहसीलदार,पोलीस निरीक्षक यांच्या रस्त्यात चहा वाल्याचे घाण.
नवीन वर्षाचा शुभारंभ चांगला होईल का.?
यावल खानदेश लावी न्यूज प्रतिनिधी दि.३१ यावल पोलीस स्टेशनच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ प्रवेश करताना उजव्या बाजूला घाण केर कचरा पडून आहे त्याचप्रमाणे यावल पोलीस निरीक्षक,यावल तहसीलदार,शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या,ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या,भारतीय स्टेट बँक,सेंट्रल बँक,शनी मंदिर,तहसील कार्यालयात,आणि पोलीस स्टेशनमध्ये दररोज येणाऱ्या जाणाऱ्या हजारो नागरिकांच्या रस्त्यात एक चहावाला आपल्या दुकानातील घाण पाणी भर रस्त्यात सर्रासपणे टाकत आहे परंतु तो सर्वांना गोड चहा पाजत असल्यामुळे भर रस्त्यात घाण पाणी फेकणाऱ्या विरुद्ध कोणीही कारवाई करत नाही ही वस्तुस्थिती आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की वरील ठिकाणी दररोज सकाळ पासून रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत पोलीस स्टेशन समोर असलेल्या वळणावर यावल सातोद रस्त्यावर एक चहावाला आपल्या चहाच्या दुकानातील घाण पाणी प्लॅस्टिकच्या कॅन भरून भरून भर रस्त्यात दिवसातून अनेक वेळा आणून टाकत असतो या पाण्यातून दररोज हजारो नागरिक विद्यार्थी आपल्या शासकीय वैयक्तिक आरोग्य विषयक आर्थिक विषय कामकाजासाठी ये- जा करीत असतात त्यांना या घाण पाण्यातून जावे लागते.वाहनांमुळे अनेक वेळा हे पाणी अनेकांच्या अंगावर उडत असते,चहा दुकानदार नागरिकांची गंमत बघून कोणी काही बोलत नाही म्हणून वारंवार पाणी भर रस्त्यात टाकत असतो, याचा बंदोबस्त आणि कार्यवाही कोणता अधिकारी कोणा मार्फत केव्हा करणार.? याबाबत यावल शहरात प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत यावल पोलीस स्टेशन मधील जबाबदार पोलीस कर्मचाऱ्यांला ही वस्तुस्थिती वारंवार सांगून सुद्धा घाण पाणी टाकणाऱ्या विरुद्ध कारवाई होत नसल्याने दुकानदार त्या पोलीस कर्मचाऱ्याला चहा पाणी पाजतो का अशी सुद्धा चर्चा यावल शहरात आहे.

