Friday, January 30, 2026
Homeजळगावनगरपरिषद अध्यक्षपदाच्या बाजूने ८ अपक्ष सदस्यांचा गट झाला नोंद.

नगरपरिषद अध्यक्षपदाच्या बाजूने ८ अपक्ष सदस्यांचा गट झाला नोंद.

नगरपरिषद अध्यक्षपदाच्या बाजूने ८ अपक्ष सदस्यांचा गट झाला नोंद.

अतुल पाटलांची राजकीय माया आणि छाया यावल तालुक्यात चर्चेचा विषय.

यावल      खानदेश ला युनिस प्रतिनिधी        दि.३१   माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्यावर मतदारांची आणि यावलकरांची राजकीय माया,छाया असल्याने लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया पाटील यांच्या समर्थनार्थ अपक्ष ८ सदस्यांचा गट आज जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंद करण्यात आला.
या एकूण ८ अपक्ष सदस्यांच्या गटनेतेपदी कमरुन्नीसा बी सैफूद्दीन तर उपगट नेतेपदी शालुबाई भालचंद्र भालेराव यांची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या समक्ष करण्यात आली.येत्या दोन-तीन दिवसात इतर ४ सदस्यांचा एक स्वतंत्र गट नोंदणी होणार असल्याने यावल नगरपालिकेत एकूण २३ सदस्य असल्याने लोकनियुक्त अध्यक्षां छाया पाटील यांच्याकडे १२ सदस्यांचे बहुमत होईल.
त्यामुळे उपनगराध्यक्ष निवड सुद्धा सौ.छाया पाटील यांच्याकडील समर्थक सदस्यांमधून होईल. बहुमतासाठी काही कायदेशीर अडचण आल्यास.लोकनियुक्त नगराध्यक्ष यांना न.पा. अधिनियमातील नविन तरतुदी नुसार नगरसेवकपद देखील बहाल करण्यात आले आहे, त्यामुळे त्या सदस्य म्हणून देखील मतदान करतील व समसमान मते पडल्यास casting of vote म्हणजे अतिरिक्त मत देतील त्यामुळे यावल नगरपरिषद उपनगराध्यक्ष सुद्धा लोकनियुक्त नगराध्यक्षां समर्थकांमधून होणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.

माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचा नगरपरिषद कामकाजाचा, निवडणुकीचा आढावा आणि कार्य लक्षात घेता,तसेच त्यांना वेळोवेळी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय मातब्बर नेत्यांचे मार्गदर्शन मिळाल्याने त्यांनी यावल नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला चांगलाच धडा शिकविल्याने अतुल पाटील यांची माया आणि मतदारांची छाया यावल नगरपरिषद ला पुन्हा लाभल्याने तालुक्यात, समाजात चर्चेचा विषय आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या