Friday, January 30, 2026
Homeजळगावकार्यकारी अभियंता निलेश अहिरे यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी खास निधी उपलब्ध, जिल्ह्यात चर्चेचा...

कार्यकारी अभियंता निलेश अहिरे यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी खास निधी उपलब्ध, जिल्ह्यात चर्चेचा विषय.

कार्यकारी अभियंता निलेश अहिरे यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी खास निधी उपलब्ध, जिल्ह्यात चर्चेचा विषय.

यावल     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             दि.१   तापी पाटबंधारे विकास महामंडळ महाराष्ट्र शासन अंगीकृत जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र.२ चे कार्यकारी अभियंता निलेश अहिरे यांच्या शासकीय निवासस्थानाची दुरुस्ती साठी शासनाने खास “लाखो रुपयाचा निधी” उपलब्ध करून दिल्याने आचारसंहितेचा भंग झाला आहे का.? शासकीय इमारतीच्या दुरुस्तीसाठी आदेश कोणी दिले.? या विभागात शासकीय कामे करण्यासाठी शासनाकडे रक्कम शिल्लक नसताना शासकीय निवासस्थानावर लाखो रुपयाचा खर्च कसा केला जात आहे.? याबाबत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की महाबळ परिसरात शासनाने पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांसाठी व इतर अधिकाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने बांधकाम केलेले आहे.
या ठिकाणी बी- ४ हे शासकीय निवासस्थान जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता निलेश अहिरे यांना निवासासाठी मिळाले आहे. व्याज निवासाची दुरुस्ती करण्यासाठी गेल्या पंधरा-वीस दिवसापासून लाख रुपये खर्चाचे बजेटची आखणी करून प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाली आहे.
संपूर्ण जळगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रात आचारसंहिता सुरू असताना निवासस्थान दुरुस्ती कोणाच्या आदेशाने सुरू करण्यात आली.
एका बाजूला निलेश अहिरे यांच्या कार्यक्षेत्रातील शेळगाव बॅरेज पुलासाठी शासनाकडे निधी शिल्लक नाही,त्याचप्रमाणे धरणांच्या कामासाठी अनेक शेतकऱ्यांची शेती शासनाने ताब्यात घेतली त्या शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे शिल्लक नाही यांच्या कार्यक्षेत्रात प्रलंबित पेंडिंग आहेत आणि दुसरीकडे शासकीय निवासस्थान दुरुस्ती रिपेअर साठी लाखो रुपयांचा खर्च कसा केला जात आहे याबाबत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या