Tuesday, February 17, 2026
Homeगुन्हागोलाणी मार्केटमध्ये भर दिवसा तरुणाची निर्घृण हत्या 

गोलाणी मार्केटमध्ये भर दिवसा तरुणाची निर्घृण हत्या 

गोलाणी मार्केटमध्ये भर दिवसा तरुणाची निर्घृण हत्या 

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरात अत्यंत वरदळीच्या ठिकाणी गजबजलेल्या व प्रतिष्ठित असलेल्या कॉल आणि मार्केट परिसरात बुधवार दि.३१ डिसेंबर या दिवशी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जुन्या वादातून एका तरुणांवर चाकूने हल्ला करून त्याचा निर्गुण असा खून करण्यात आला. यामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली
घटना घडली त्यावेळेला त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांने समय सुचकता बाळगून प्रथम त्या तरुणाला वाचविण्याचा प्रयत्न केला. जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या दरम्यान पोलिसांने सिनेमा स्टाईल पद्धतीने धाव घेऊन हल्लेखोर आला ताब्यात घेतले.

हत्या झालेल्या तरुणाचे नाव साई गणेश बोराडे वय १८ रा.शंकरराव नगर जळगाव असे आहे तो देवकर महाविद्यालयात डिप्लोमा शिक्षण घेत होता तो कुटुंबासह वरील ठिकाणी वास्तव्यास आहे दरम्यान संशयित आरोपी शुभम रवींद्र सोनवणे रा.चौगुले प्लॉट जळगाव याच्याशी साई बोराडे यांचा मागील काही काळापासून वाद सुरू होता.
बुधवारी सकाळी सुद्धा किरकोळ कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक
चकमक उडाल्याची माहिती आहे दुपारी साई बोराडे हा कामानिमित्त गोलानी मार्केट परिसरात गेला असता तेथे आलेल्या शुभम सोनवणे यांनी अचानक त्याच्यावर चाकू काढून साईच्या उजव्या बाजूस वार केला त्यानंतर त्यांने डाव्या बाजूसही चाकूने गाव घालून त्याला गंभीर जखमी केली या घटनेने गोलाणी मार्केट परिसरात मोठी खळबळ उडाली याचवेळी मोबाईलच्या कामानिमित्त गोलानी मार्केटमध्ये आलेले एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस हवलदार रमेश बाबुलाल चौधरी यांनी प्रसंगावधान घटनास्थळी धाव घेतली त्यांनी हल्लेखोर शुभम सोनवणे याला पकडून पुढील वार होण्यापासून साई बोराडे याला वाचवले तत्काळ संबंधित आरोपीला शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले जखमी साई बोराडे याला नागरिकांच्या मदतीने प्रथम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आली त्या ठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात घालविण्यात आले त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सागर शिंपी यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिसराची पाहणी केली तसेच रुग्णालयात जाऊन तरुणाची विचारपूस केली साई बोराडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या