आठवणीत रमले कुऱ्हे पानाचे येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयातील ६५ पार विद्यार्थी !
छात्रालयातील विद्यार्थी झाले भावुक
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – कुऱ्हे पानाचे
येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय तत्कालीन न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष १९७६-७७ मध्ये दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा वर्ग मंगळवार दि. ३० डिसेंबर रोजी पुन्हा भरला. माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने जवळपास २५ वर्गमित्र परिवारासह तब्बल ४८ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा दिला. मोंढाळे रस्त्यालगत जोगेश्वरी माता मंदिराजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सोशल मिडियाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष एकमेकांना भेटून शैक्षणिक वर्ष १९७६-७७ च्या इयत्ता दहावीच्या २५ वर्ग मित्रांनी पुढाकार घेऊन जवळपास वयाच्या ६५ वर्षात पदार्पण करणाऱ्या वृद्ध मित्रांनी स्नेह मेळावा घडवून आणला. शिक्षकांविषयी कृतज्ञता म्हणून शिक्षकांना गेट पासून सभामंडपापर्यंत गुरुजनांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान सर्व वर्ग मित्र मैत्रिणींनी जोडीने सभामंडपात प्रवेश केला. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने तसेच स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे शिक्षक व विद्यार्थी मयत झाले होते त्यांना श्रद्धांजली वाहिली. प्रसंगत माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना शाल, श्रीफळ, बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर भाजी, पोळी, दाळ, भात, शिरा या स्नेहभोजनचा सर्वांनी आनंदाने आस्वाद घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शैक्षणिक वर्ष १९७६-७७ च्या इयत्ता दहावीच्या सर्व वर्ग मित्रांनी परिश्रम घेतले. माजी विद्यार्थ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजारामशेठ बडगुजर यांच्या प्रतिमा भेट दिली. ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एकनाथ बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात शिक्षक आर टी बारी, वाय के वराडे, कालिदास कळसकर, मुख्याध्यापक एस पी चौधरी तसेच एस एस सी १९७६ – ७७ च्या बॅचचे विद्यार्थी उपस्थित होते.
उतार वयात शालेय


