नगराध्यक्षा छाया पाटील यांनी 56 कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेसह संपूर्ण कामांचा आढावा घेऊन महत्त्वाच्या सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी यांच्याकडे मुख्याधिकारी गवईची लेखी तक्रार.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२ नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ.छाया पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन दिवसातच आज शुक्रवार दि. २ जानेवारी २०२६ रोजी ५६ कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेसह संपूर्ण कामांचा आढावा घेऊन कार्यालयीन कर्मचाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.
राज्यातील नागरी भागात मूलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व त्याचा दर्जा वाढविण्याकरता शासन निर्णयाच्या तरतुदीअन्वये नगर विकास विभागामार्फत नगरोत्थान महाअभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार यावल नगर परिषदेचा पाणीपुरवठा प्रकल्प नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडे प्रकल्प मान्यता समितीकडे सादर करण्यात आला होता, या प्रकल्पास मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक विभाग यांनी तांत्रिक मान्यता दिलेली आहे त्या अनुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीने दि.१३ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये केलेल्या शिफारशीनुसार सदर प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आणि त्यानुसार मुख्य कार्यारंभ आदेश सुद्धा मे एस.सी.आय. पी.एल.संदीप कन्स्ट्रक्शन जे.व्हि.गंगाखेड या कंपनीला देण्यात आला आणि कॉन्ट्रॅक्टर ठेकेदाराने गेल्या काही महिन्याच्या प्रशासकीय कार्यकाळात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.
यावल नगरपरिषद मुख्याधिकारी आणि पाणीपुरवठा महिला अभियंता यांचे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदाराशी कार्यालयीन हितसंबंध, संगनमत असल्याने सदरच्या 56 कोटी रुपयाच्या कामाबाबत जनतेच्या माहितीसाठी आणि आणि कामाच्या ठिकाणी माहिती फलक लावलेला नाही आणि माहिती सुद्धा दिलेली नाही.
अनेकांच्या तोंडी लेखी तक्रारी असताना माहिती लपवून ठेवलेली आहे.
नगराध्यक्षा छाया पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वात प्रथम या ५६ कोटी रुपयांच्या कामाबाबत प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन काम मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे सुरू आहे किंवा कसे..? याबाबत माहिती घेतली आणि इतर कामांबाबत सुद्धा नगरपरिषद कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा सूचना दिल्या.
मुख्याधिकारी निशिकांत गवई सूचना न देता गैरहजर – –
यावल नगरपरिषद मुख्याधिकारी निशिकांत गवई हे सूचना न देता
यावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल
दि.२१/१२/२०२५ रोजी लागला असून मी सौ.छाया अतुल पाटील लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेली आहे.तसेच दि. २९/१२/२०२५ रोजी मी सदर पदाचा पदभार स्वीकारला.परंतु दि. २९/१२/२०२५ ते ०२/१/२०२६ पावेतो नगरपरिषदेस २-३ वेळेस भेट देण्यात आल्यावर असे निदर्शनास आले की मुख्यधिकारी
निशिकांत गवई हे निवडणूक निकाल लागले पासून ते आज दि ०२ जानेवारी २०२६ पावेतो कोणतीही पूर्वसूचना न देता नगरपरिषद कार्यालयास गैरहजर आहेत.त्यांचा कोणताही रजेचा अर्ज कार्यालयास प्राप्त नाही तसेच प्रशासन काळात सुद्धा ते वारंवार गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे.तरी आपण यावल मुख्यधिकारी यांच्या विरुद्ध योग्य ती शिस्तभंगाची कार्यवाही करावी असे जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दि.२ रोजी दिलेल्या तक्रार अर्जात नगराध्यक्षा छाया अतुल पाटील यांनी नमूद केले आहे.

