सातोद ग्रामस्थांना अल्प प्रमाणात, अनियमित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडे.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२
तालुक्यातील सातोद ग्रामपंचायत मार्फत होणारा पाणीपुरवठा हा फारच अल्प प्रमाणात आणि अनियमित होत असल्याची तक्रार सातत ग्रामस्थांनी सरपंच ग्रामसेवक यांच्याकडे केली आहे.
सातोद येथील काही ग्रामस्थांनी १ जानेवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की,
ग्रामपंचायत मार्फत पाणी पुरवठा करणारा कर्मचारी व्हालमन हा काही दिवसापासून पाणीपुरवठा
वेळेवर करीत नाही सध्या पाणी पुरवठ्याची वेळ सकाळी ४ वाजता ठेवण्यात आलेली आहे. ही वेळ
सर्वसामान्य नागरिकांना गैरसोयीची असल्याने सदर वेळ सकाळी ६ वाजता करण्यात यावी.
पाणी सोडण्याची जबाबदारी असलेली व्यक्ती व्हालमन पाणी हेतुपुरस्सर कमी प्रमाणात सोडतो
यामुळे काही भागात पाणी पोहोचत नाही.तरी याबाबत योग्य ती चौकशी करून संबंधितास सूचना देण्यात याव्यात व सर्व नागरिकांना समान,वेळेवर,नियमित,पुरेसा, मुबलक पाणीपुरवठा करण्याबाबत सूचना कराव्यात गावामध्ये एकूण ३ पाण्याच्या टाक्या असून सदर टाक्यांमधील पाणी अनेक वेळा पाण्याच्या टाकीतून ओव्हरफ्लो
होत असतो.असे असताना तळले वाडा धांडे वाडा या वार्डात पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने व अपुरा होत आहे.पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याला ग्रामस्थांनी सांगितले
तर ते अस म्हणतात पाईप लाईन खराब आहे जेवढे मिळले तेवढे पाणी घ्यायचे असे उत्तर देतो
तरी वरील सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पाहणी करून सुरळीत,नियमित पुरेसा
पाणीपुरवठा करावा.तसेच गावात पाणीपुरोठ्याचे व्हाल किती आहे तसेच त्यांना किती वेळ पाणी दिले जाते याची सविस्तर माहिती ग्रामस्थांना तात्काळ मिळावी अशी मागणी सातोद येथील अनेक ग्रामस्थांनी सरपंच यांच्याकडे निवेदनावर स्वाक्षरी करून दिली आहे. या तक्रारीची दखल सरपंच ग्रामसेवक घेणार किंवा नाही याकडे ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे.

