Thursday, January 29, 2026
Homeजळगावयश मिळवायचे असेल तर मेहनतीला पर्याय नाही – प्रांताधिकारी बबनराव काकडे विदयार्थ्यांना...

यश मिळवायचे असेल तर मेहनतीला पर्याय नाही – प्रांताधिकारी बबनराव काकडे विदयार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन 

यश मिळवायचे असेल तर मेहनतीला पर्याय नाही – प्रांताधिकारी बबनराव काकडे
विदयार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी —

धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन “धनोत्सव-२०२५” च्या पारितोषिक वितरण समारंभात फैजपूरचे प्रांताधिकारी श्री. बबनराव काकडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, सखोल अभ्यास आणि आकलन क्षमता ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली आहे. ती वाढवायची असेल तर मेहनतीला पर्याय नाही.
पारितोषिक वितरण समारंभाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी केले. कार्यक्रमाच्या

 

अध्यक्षस्थानी माजी आमदार श्री. शिरीष मधुकरराव चौधरी (अध्यक्ष, तापी परिसर विद्यामंडळ, फैजपूर) उपस्थित होते. तसेच मंचावर संस्थेचे पदाधिकारी, नियामक मंडळाचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते. यामध्ये डॉ. एस. के. चौधरी (उपाध्यक्ष), श्री. मिलिंद शंकर वाघुळदे (उपाध्यक्ष), श्री. लिलाधर विश्वनाथ चौधरी (चेअरमन), श्री. नंदकिशोर आसाराम भंगाळे (सहसचिव), कार्यकारी मंडळ व नियामक मंडळ सदस्य श्री. संजय काशिनाथ चौधरी, डॉ. शशिकांत सदाशिव पाटील, डॉ. नितीन महाजन आदि पदाधिकारी उपस्थित होत, तसेच प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे, प्रा. मनोहर सुरवाडे (उपप्राचार्य), प्रा. कल्पना पाटील (उपप्राचार्य), प्रा. हरीश नेमाडे (उपप्राचार्य), डॉ. विजय सोनजे (विद्यार्थी विकास अधिकारी) व डॉ. जगदीश खरात (स्नेहसंमेलन समिती प्रमुख) आदी मान्यवर उपस्थित होते.
दि. २ जानेवारी २०२६ रोजी धनोत्सव २०२५ निमित्त रांगोळी, चित्रकला, मेहंदी, नेल आर्ट, वक्तृत्व, वाद-विवाद, काव्यवाचन, काव्यलेखन, समूह नृत्य, गायन, डान्स अशा विविध प्रकारचे कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धांतील विजयी उमेदवारांना महाविद्यालयाच्या वतीने प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके देऊन सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
तसेच महाविद्यालयातर्फे एनएसएस, एनसीसी व क्रीडा विभागामार्फत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या

 

विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. दामोदर नाना क्षमता विकास प्रबोधिनीमार्फत स्पर्धा परीक्षांद्वारे विविध पदांवर यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. याशिवाय महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मिळवलेली पेटंट्स तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांबद्दलही त्यांचा गौरव करण्यात आला.
महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेचा मानला जाणारा आदर्श माता–पिता पुरस्कार कुमारी तेजल रवींद्र वायकोळे (टी. वाय. बी.एस.सी.) यांना प्रदान करण्यात आला. तसेच आदर्श विद्यार्थी म्हणून मुजम्मिल शेख सय्यद, आदर्श विद्यार्थिनी म्हणून कुमारी जान्हवी गोविंदा जावळे, ‘गरीब हुशार होतकरू’ विद्यार्थी व विद्यार्थिनी पारितोषिक विज्ञान शाखेतून चारुलता विनायक पाटील, कला शाखेतून लीना प्रदीप गाजरे, वाणिज्य शाखेतून भावना विनोद साखळीकर, कनिष्ठ महाविद्यालयातून कोमल जितेंद्र चौधरी व रोहित सुनील विंचुलकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.आर. बी. वाघुळदे यांनी केले, आभार स्नेहसंमेलन समिती प्रमुख डॉ. जगदीश खरात यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. कॅप्टन राजेंद्र राजपूत, प्रा.गोविंद मारतळे, डॉ.नरेंद्र मुळे, प्रा. दिलीप बोदडे व प्रा.स्वाती महाजन यांनी केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या