Thursday, January 29, 2026
Homeजळगावपाल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन

पाल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन

पाल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन
रावेर पाल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी          सातपुडा विकास मंडळ पाल संचालित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पाल येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष हिवाळी शिबिर दत्तक गाव गारखेडा ता. रावेर येथे सुरू झाले. “शाश्वत विकासासाठी युवक: पाणलोट व्यवस्थापन व पडित जमीन विकासावर विशेष भर” थीमवर हे शिबिर आधारलेले आहे. प्रमुख अतिथी मा. प्रा.महेश महाजन , श्री कामिल तडवी पाल, कोमल बरके जि.प. शाळा गारखेडा हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. अशोक आत्माराम झांबरे होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.पी.लभाणे उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. शिबिरात या दत्तक गावात ग्राम स्वच्छता,जल व्यवस्थापन ,वृक्ष लागवड, मतदार जनजागृती, आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष एच जहूरे यांनी ही माहिती दिली. प्रास्ताविक सोनाली पवार हिने केले. सूत्रसंचालन नर्गिस तडवी तर आभार प्रदर्शन तरन्नुम तडवी हिने केले. यावेळी महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.नफिसा तडवी , प्रा. डॉ.अमोल पाटील, प्रा.चारुलता चौधरी, प्रा.ऊर्मिला बारेला, राजु नाथबाबा , सय्यद तडवी आणि रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या