शिक्षण ही काळाची गरज:-सैय्यद जावेद अहमद यांचे प्रतिपादन….
संविधान नगर नामकरण व शौर्य दिन उत्साहात साजरा.
यावल खानदेश ला युनिस प्रतिनिधी दि.,४
एक दिवस उपाशी राहा परंतु आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन शिकवा कारण शिक्षण ही काळाची गरज आहे “जो समाज अपना इतिहास नही जाणता ओ समाज इतिहास बना नही सकता” डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या जोरावर कोणतेही हत्यार हातात न घेता अहिंसेच्या मार्गाने व पेनरुपी तलवारीने मोठी समाजिक ऐतिहासिक क्रांती केली व संपूर्ण बहुजन समाजाला न्याय मिळवून दिला असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणात सैय्यद जावेद अहमद यांनी केले
१ जानेवारी १८१८ च्या कोरेगांव भिमाच्या लढाईत ज्या पाचशे शुरविरांनी अठ्ठावीस हजार सैन्यावर विजय मिळविला त्या शुरवीरांच्या पराक्रमाला कार्याला उजाळा देण्यासाठी शौर्य दिन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला याच दिवसाचे निमित्त साधून नवीन प्लॉट भागाचे “संविधान नगर ” असे नामकरण करून फलकाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष सैय्यद जावेद अहमद यांच्या हस्ते करण्यात आले.
याठिकाणी सरपंच सैय्यद असद अहमद व ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या माध्यमातून येत्या पंधरा दिवसांत सिमेंट कॉक्रेटीकरण करण्यात येईल तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी ग्रा.पं.मालकीच्या गावठाण जागेतुन जागा उपलब्ध करुन देणे या दोन्ही गोष्टी साठी ग्रा.पं.कट्टीबंध्द असल्याचे ठोस आश्वासन देण्यात आले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे द्विपधुपाने पुजन व माल्यापन प्रमुख पाहुणे पोलिस पाटील नरेश मासोळे,बोधाचार्य तथा केंद्रीय शिक्षक बि डी महाले सर,बौध्दाचार्य विलास तायडे, धम्मसेवक बबन तायडे, माजी सरपंच कडू तायडे ,तुकाराम तायडे ,अशोक तायडे,बाळासाहेब तायडे, राजू तायडे ,ग्रा.पं. सदस्य संदीप तायडे ,लक्ष्मी मेढे यांच्या हस्ते करण्यात आले समता सैनिक दल व तरुणांतर्फे विजय स्तंभाला मानवंदना घेण्यात आले व सामूहिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार बौद्ध उपासक यांच्या हस्ते करण्यात आला तसेच मान्यवरांच्या हस्ते लहान मुलांचा सामुहिक सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बाळासाहेब तायडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सिध्दार्थ तायडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर तायडे, दीपक तायडे ,करण तायडे, शुभम तायडे ,संदीप तायडे, सौरभ तायडे ,बाळू गोमे, नितीन तायडे ,कुलदीप तायडे ,नरेंद्र तायडे, राधेश्याम तायडे भूषण तायडे, अमोल तायडे ,सुरज तायडे,उदय तायडे,आनंद तायडे,अतुल तायडे,राकेश तायडे,अमोल तायडे,असिश तायडे,करामत तडवी,इत्यादींचे सहकार्य लाभले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

