Thursday, January 29, 2026
Homeजळगावप्राचीन भारतीय ज्ञान प्रणाली हा देशासाठी समृद्ध वारसा – प्र. कुलगुरू डॉ....

प्राचीन भारतीय ज्ञान प्रणाली हा देशासाठी समृद्ध वारसा – प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन

प्राचीन भारतीय ज्ञान प्रणाली हा देशासाठी समृद्ध वारसा – प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन

फैजपूर: खान्देश लाईव्ह प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील PM-USHA सॉफ्ट कॉम्पोनंट विभाग व धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत “भारतीय ज्ञान प्रणाली” या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
या परिषदेसाठी राज्यभरातून जवळपास ४०० प्राध्यापकांनी नोंदणी केली असून महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील नामवंत संशोधक प्राध्यापकांनी १९० पेक्षा अधिक संशोधन पेपर प्रकाशनासाठी सादर केले आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. प्रा. डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन (प्र. कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक) यांच्या हस्ते झाले. त्यांनी भारतीय ज्ञान प्रणालीचा समृद्ध वारसा अधोरेखित करत त्याचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्रा. एन. ए. भंगाळे (सहसचिव, तापी परिसर विद्यामंडळ, फैजपूर) होते. त्यांनी भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अंगीकार आपल्या दैनंदिन जीवनात करून जीवन समृद्ध करावे, असे आवाहन केले तसेच परिषदेच्या उत्कृष्ट

 

नियोजनाबद्दल आयोजन समितीचे कौतुक केले.
बीजवक्ता म्हणून प्रा. डॉ. राजेंद्रकुमार रावल (सी.सी. सेट वाणिज्य महाविद्यालय, अहमदाबाद) यांनी भारतीय ज्ञान परंपरेविषयी सखोल मार्गदर्शन केले. दिवसभरातील प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. संजयकुमार शर्मा (अध्यक्ष, हिंदी अभ्यास मंडळ, कबचौउमवि, जळगाव; हिंदी विभाग प्रमुख, तळोदा महाविद्यालय), डॉ. तुषार रायसिंग (संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग, उपमुख्य संशोधक, भारतीय मानव्यविद्या अध्ययन केंद्र, कबचौउमवि, जळगाव) आणि डॉ. एस. ए. पाटील (सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालय, ऐनपूर) यांनी भारतीय ज्ञान प्रणालीच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन केले.
या प्रसंगी मंचावर संस्थेचे सचिव प्रा. एम. टी. फिरके, मा. प्राचार्य एस. एस. पाटील, उपप्राचार्य डॉ. मनोहर सुरवाडे, डॉ. कल्पना पाटील, डॉ. एच. जी. नेमाडे, परिषद समन्वयक डॉ. विजय सोनजे व सहसमन्वयक प्रा. शिवाजी मगर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. शिरीषदादा चौधरी, डॉ. एस. के. चौधरी (उपाध्यक्ष), श्री. मिलिंद वाघुळदे (उपाध्यक्ष) व श्री. लिलाधर चौधरी (चेअरमन) यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी केले. दिवसभरातील चारही सत्रांचे सूत्रसंचालन अनुक्रमे कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत, प्रा. ताराचंद सावसाकडे, प्रा. नाहीदा कुरेशी व प्रा. सीमा बारी यांनी केले. आभार प्रदर्शन समन्वयक डॉ. विजय सोनजे यांनी, तर समारोप सत्रासाठी सहसमन्वयक प्रा. शिवाजी मगर यांनी केले.
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील संशोधक, मार्गदर्शक व चिकित्सकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विविध समिती प्रमुख व सदस्यांनी परिश्रमपूर्वक मोलाचे सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या