विद्यापीठस्तरीय आविष्कार 2025 स्पर्धेत धनाजी नाना महाविद्यालयातील संशोधकांचे यश.
फैजपूर: खान्देश लाईव्ह प्रतिनिधी धनाजी नाना महाविद्यालय येथील चि.उमेद लोखंडे व प्रा.दीपक पाटील यांची राज्यस्तरीय आविष्कार 2025-26 साठी निवड झाली असून प्रा. शिवाजी मगर यांची विद्यापीठ स्तरीय आविष्कार मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे या तिहेरी यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिरीषदादा चौधरी, डॉ.एस.के.चौधरी (उपाध्यक्ष), श्री.मिलिंद वाघुळदे (उपाध्यक्ष), श्री. लिलाधर चौधरी (चेअरमन), श्री. मुरलीधर फिरके (सचिव) श्री. नंदकुमार भंगाळे (सहसचिव) तसेच सर्व पदाधिकारी, प्राचार्य, डॉ. राजेंद्र वाघुळदे, उपप्राचार्य डॉ. मनोहर सुरवाडे, डॉ. कल्पना पाटील, डॉ. हरीश नेमाडे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. या आविष्कार 2025-26 चे समिती चेअरमन डॉ. शरद बिऱ्हाडे, संघ प्रमुख डॉ. योगेश तायडे डॉ. सीमा बारी यांचे सहयोग लाभले.

