Sunday, November 22, 2026
Homeजळगावरन भुसावळ उपक्रमात 1000 भुसावळकर धावले रोटरी रेल सिटी चा भव्य आयोजन

रन भुसावळ उपक्रमात 1000 भुसावळकर धावले रोटरी रेल सिटी चा भव्य आयोजन

भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व नामदार संजयभाऊ सावकारे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रन भुसावळ ‘ हा भुसावळवासियासाठी भव्य जागरुकता कार्यक्रम आज दि 11 जानेवारी रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर संपन्न झाला.

यात एकूण 1063 विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि नागरिक सहभागी झाले. याप्रसंगी ना. संजय भाऊ सावकारे व प्रमुख पाहुणे म्हणून इव्हेंट अंबेसेटर प्रतीक मणियार सीए जळगाव तसेच पोलीस उपअधीक्षक बारबोले साहेब, पोलीस निरीक्षक राहुल वाघ साहेब, पोलीस वाहतूक निरीक्षक उमेश महाले साहेब, त्याचप्रमाणे प्रायोजक असणारे ओबिनोल फाउंडेशन चे अश्विन परदेशी, किड्स गुरुकुलचे करण जैन,एस आर मार्बलचे सिताराम सैनी, महादेव डिस्ट्रीब्युटर्स चे पंकज कृपालांनी,मॉन्जीनिज बेकरी चे एडवोकेट तुषार पाटील, एनरझोल एनर्जी ड्रिंक चे संचालक देवेंद्र गिते हे व्यासपीठावर उपस्थित होते. या शिवाय साईजीवन सुपरशॉपी व पूजा कन्स्ट्रक्शन हे सुद्धा या कार्यक्रमाला प्रायोजक होते.

रन भुसावळ मध्ये दहा किलोमीटर पाच किलोमीटर तसेच तीन किलोमीटर अशा अंतरासाठी सर्व स्पर्धक धावले. या सर्व धावकांसाठी रस्त्यामध्ये जागोजागी पाणी,एनर्जी ड्रिंक तसेच प्रथमोपचाराची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पारुल वर्मा यांनी झुंबा डान्स द्वारे सर्व स्पर्धकांचे वार्मअप घेतले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिसारा रनर ग्रुप ,तापी रनर ग्रुप ,तसेच राधाकृष्ण प्रभात फेरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमांमध्ये रहदारी नियंत्रण हे वाहतूक पोलीस व रोटेरियन बांधवांच्या मदतीने करण्यात आले. स्पर्धेचे संचालन हे भुसावळ मधील सर्व क्रीडा शिक्षकांनी समर्थपणे सांभाळले. सर्व स्पर्धकांसाठी सर्टिफिकेट मेडल तसेच पौष्टिक नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. या स्पर्धेत अनुक्रम नंबर न काढता लकी ड्रॉ पद्धतीने भेट वस्तू देण्यात आल्या. पाच कराओके साऊंड सिस्टिम व एक 22 इंची एलईडी हे बक्षीस महादेव इलेक्ट्रॉनिक्स चे पंकज क्रिप्लानि यांनी प्रायोजित केले होते. भाग्यवान विजेते पुढील प्रमाणे डॉक्टर पूजा बलके,युवराज सूर्यवंशी, धीरज बारेला,शुभम तिवारी,प्रमिला परिहार, यांना साऊंड सिस्टिम मिळाले तर साई दिलीप सोनवणे याला 22 इंची एलईडी टीव्ही मिळाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मकरंद चांदवडकर यांनी केले तर या कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी प्रोजेक्ट चेअरमन सुयश न्याती, को चेअरमन चेतन पाटील, अध्यक्ष देवा वाणी, सचिव हरमित सिंग माखन तसेच सर्व रोटेरियन बांधवांनी परिश्रम घेतले ..

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या