Thursday, January 29, 2026
Homeजळगावमुक्ताईनगर नगरपंचायतीत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची एकमताने निवड

मुक्ताईनगर नगरपंचायतीत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची एकमताने निवड

मुक्ताईनगर नगरपंचायतीत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची एकमताने निवड

मुक्ताईनगर   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर नगरविकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या पदांवर एकमताने निवडी करण्यात आल्या आहेत. १२ जानेवारी रोजी नगराध्यक्षपदी संजना चंद्रकांत पाटील यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी, १३ जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया पार पडली.
१३ जानेवारी रोजी झालेल्या निवड बैठकीत देवयानी निलेश शिरसाठ यांची उपनगराध्यक्षपदी एकमताने व बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच छोटू बाबुराव भोई व नितीन मदनलाल जैन यांची नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत नगरसेवक) म्हणून सर्व सदस्यांच्या सहमतीने निवड करण्यात आली.
या निवडी जाहीर होताच नगरपंचायत परिसरात शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत तसेच घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी मुक्ताईनगर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश पुदाके, नगरपंचायतीचे अधिकारी-कर्मचारी तसेच सर्व नगरसेवक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*चौकट*

“पुढील पाच वर्षांसाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून लवकरच भूमिगत गटारीचे कामही हाती घेतले जाईल. शहरातील प्रत्येक प्रभागातील समस्या सोडवण्यावर भर राहील.”
– आमदार चंद्रकांत पाटील

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या