Saturday, March 28, 2026
Homeचाळीसगावबसच्या धडकेत १३ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू !

बसच्या धडकेत १३ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू !

बसच्या धडकेत १३ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू !

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – बसस्थानकात एस. टी. महामंडळाच्या बसच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या १३ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तालुक्यातील वडगाव लांबे परिसरात शोककळा पसरली आहे.

वडगाव लांबे येथील आठवीत शिक्षण घेणारी माधुरी शिवाजी मोरे (वय १३) ही विद्यार्थिनी १७ जानेवारीला दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास चाळीसगाव बसस्थानकात उभी होती. या वेळी एस.टी. महामंडळाची बस (२२१९) तिच्या पायावरून गेली. या अपघातात माधुरी मोरे ही गंभीर जखमी झाली होती. तर अपघातानंतर तिला तत्काळ चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी तिला धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वडगाव लांबे व चाळीसगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अपघातानंतर तातडीची मदत मिळण्यास विलंब झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तर, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून एस.टी. महामंडळाच्या संबंधित चालक व कर्मचाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी वडगाव लांबे येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, बसस्थानक परिसरात प्रवासी व विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या