Thursday, January 29, 2026
Homeजळगावलेवा पाटीदार महासंघाकडून सौ. पुनम विजय फालक यांचा गौरव म्हणजे आमच्या फालक...

लेवा पाटीदार महासंघाकडून सौ. पुनम विजय फालक यांचा गौरव म्हणजे आमच्या फालक परिवाराचा अभिमान – ताप्ती एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष मोहन फालक

लेवा पाटीदार महासंघाकडून सौ. पुनम विजय फालक यांचा गौरव म्हणजे आमच्या फालक परिवाराचा अभिमान – ताप्ती एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष मोहन फालक

भुसावळ : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी येथील ताप्ती पब्लिक विद्यालयाच्या उपशिक्षीका, आदर्श शिक्षिका पुरस्कार तसेच मानाचा शाहु महाराज मानाचा नारी रत्न पुरस्कार प्राप्त व आंतरराष्ट्रीय संस्थेकडून शिक्षा शिरोमणी पुरस्कार प्राप्त सौ. पूनम विजय फालक यांनी केलेल्या कार्याची दखल लेवा पाटीदार महासंघाने घेतली असून त्यांना थोपटे लॉन्स, रहाटणी, पुणे येथे लेवा पाटीदार महासंघातर्फे ‘कर्तृत्ववान महिला’ हा पुरस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक व महानगरपालिकेचे सभागृह नेते तसेच स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे संचालक, नामदेव दादा ढाके, लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले, डि.जी.पी. डॉ. सुहास वारके, गोदावरी फाउंडेशन च्याअध्यक्षा व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डाॅ. केतकी उल्हास पाटील, जळगाव लेवा समाज मंडळ अध्यक्ष , एल एम सी ग्रुप चे अध्यक्ष मिलींद चौधरी, तसेच लेवा पाटीदार महासंघाचे सदस्य विजय फालक,भंगाळे गोल्ड जळगावच्या संचालिका सुरेखा भंगाळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते त्यांना गौरवण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संखेने समाज बांधव व महिला ऊपस्थित होते. पुरस्कार सोहळ्यानंतर ॲड. जयश्री पाचपांडे, दिपक पाचपांडे, समाजसेवी खुशबु फिरके, चंदन फिरके यांचेसह अनेक ऊपस्थीतांनी त्यांचे अभिनंदन केले.

 


सौ.पुनम फालक यांनी पुरस्कारांचा चौकार मारल्याबद्यल कुर्‍हे पानाचे येथील जयलक्ष्मी अँकेडेमी ने अभिनंदन समारोहचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गणेश आरतीने झाली.हा पुरस्कार फक्त पुरस्कार नसुन फालक परिवाराचा अभिमान असून सौ. पूनम फालक यांनी घेतलेल्या मेहनतीचे, आदर्शाचे व कार्य तप्तरतेचे, चिकाटीचे,
कार्यक्षमतेचे द्योतक आहे. यामुळे परिवाराला व समाजाला प्रेरणा मिळते. मला नमूद करावेसे वाटते की मी अध्यक्ष असलेल्या संस्थेत त्या कार्यरत आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटला असून यापुढे सुद्धा त्यांनी जिद्दीने, मेहनतीने नवनवीन क्षेत्र पदांक्रांत करून संस्थेचे, विद्यालयाचे व परिवाराचे नाव उज्वल करावे. त्यांनी आजपर्यंत घेतलेल्या मेहनतीचे कष्टाचे प्रयत्नाचे व संसार रुपी भवसागरात ठामपणे उभे राहिलेल्या व आदर्श निर्माण करणाऱ्या आदर्श व्यक्तीचा सत्कार करतांना आम्हाला धन्यता वाटत आहे व यांचाच आम्हाला अभिमान आहे असे संस्थाध्यक्ष मोहन मोरेश्वर फालक यांनी नमुद केले.
श्री दे .ना .भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी फलक यांनी सुद्धा आपल्या भाषणातून फालक यांच्या कार्यावर प्रकाश टाकून अशाप्रकारे जर नारी ही ठामपणे आपल्या कर्तुत्वावर व केलेल्या कार्यावर विश्वासाने उभी राहिली तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. आज त्यांचे अभिनंदन करताना आम्ही स्वतःला गौरवास्पद समजत असुन त्या शिक्षण क्षेत्रात अत्युत्तम भरारी घेतील तसा आशावाद प्रकट केला.चेअरमन महेश फालक यांनी सुध्दा आपल्या भाषणातुन शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी विष्णू चौधरी, ताप्ती पब्लीक स्कुलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, फालक परीवाराचे सर्व सदस्य,नातेवाईक व मित्र परीवार मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
उपस्थीतांचे स्वागत विजय फालक, गोकुळ फालक, जयराज फालक, माधुरी फालक यांनी केले. सुत्रसंचालन लावण्या फालक यांनी केले तर आभार जयंत फालक यांनी मानले.ऊपस्थीत सर्वांनी सौ.पुनम फालक यांचा सत्कार केला. सुंदर व सुटसुटीत कार्यक्रम झाल्याची उपस्थीतामध्ये चर्चा होती. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या