भुसावळात सौ. सविताताई पाटील यांच्या निवासस्थानी हळदीकुंकवाचा भव्य सोहळा !
भुसावळ नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. गायत्रीताई भंगाळे यांची प्रमुख उपस्थिती !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – भुसावळ शहरातील जगन्नाथ नगर परिसरात क्षत्रिय राजपूत करणी सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष श्री. संदीपराणा पाटील यांच्या धर्मपत्नी सौ. सविताताई संदीपराणा पाटील यांच्या निवासस्थानी ‘हळदीकुंकू’ समारंभ अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. या सोहळ्याला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण भुसावळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. गायत्री चेतन भंगाले यांची उपस्थिती होती. त्यांच्या आगमनाने सोहळ्याची शोभा द्विगुणीत झाली. सविताताई पाटील यांनी नगराध्यक्षांचे आपुलकीने स्वागत केले.

भक्ती आणि परंपरेचा संगम
सौ. सविताताई पाटील यांनी या कार्यक्रमासाठी विशेष नियोजन केलेहोते. यात प्रामुख्याने खालील मान्यवर आणि संस्थांच्या प्रतिनिधींची उपस्थिती लक्षणीय होतीः कुबेरेश्वर महादेव बारा ज्योतिर्लिंग देवस्थान येथील संचालक व सेवेकरी महिला.श्री संत गजानन महाराज देवस्थान येथील महिला सेवेकरी. जगन्नाथ नगर व भुसावळ शहरातील महिला मोठ्या संख्येने उ उपस्थीत होते .
सामाजिक सलोख्याचे दर्शन

पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यात महिलांनी एकमेकींना हळदीकुंकू लावून शुभेच्छा दिल्या. सौ. सविताताई पाटील यांनी आलेल्या प्रत्येक महिलेचे स्वागत करून आदरातिथ्य केले. या कार्यक्रमामुळे परिसरात एकतेचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतीय संस्कृतीचा हा वारसा जपल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

