Tuesday, February 10, 2026
Homeगुन्हाकाहीही कारण नसतांना दोघं मित्रांना बेदम मारहाण ; गुन्हा दाखल!

काहीही कारण नसतांना दोघं मित्रांना बेदम मारहाण ; गुन्हा दाखल!

काहीही कारण नसतांना दोघं मित्रांना बेदम मारहाण ; गुन्हा दाखल!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – काहीही कारण नसतांना अक्षय शरद सकट (वय २२, रा. अर्जुन नगर, हरिविठ्ठल नगर) या तरुणासह त्याच्या मित्राला तिघांनी मारहाण केली. तसेच रस्त्यावर पडलेला दगड त्याच्या डोक्यात टाकून गंभीर जखमी केले. ही घटना दि. २० जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास राजीवगांधी नगरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील हरिविठ्ठल नगरात राहणारे अक्षय सकट हा तरुण वास्तव्यास आहे. दि. २० जानेवारी रोजी राजीव गांधी नगरात रात्री ११ वाजेच्या सुमारास तेजस लोंढे, सितेश लोंढे व गणेश लोंढे या तिघांनी काहीही कारण नसतांना अक्षय व त्याच्या मित्राला शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी तेजस लोंढे याने रस्त्यावर पडलेला दगड अक्षय सकट याच्या डोक्यात मारुन त्याला गंभीर जखमी केले. दरम्यान, सकट याने उपचार घेतल्यानंतर दि. २१ रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित तेजस संजय लोंढे, सितेश भारत लोंढे व गणेश अशोक लोंढे (तिघ रा. राजीवगांधी नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ उषा सोनवणे या करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या