कजगावमध्ये गोळीबाराचा थरार! तीन राउंड फायरिंग; २२ वर्षीय तरुण गंभीर जखमी

सौर ऊर्जा प्रकल्पाजवळ घडली घटना; जयेश पवारच्या डोक्यात लागली गोळी, उपचारासाठी धुळे येथे हलविले; अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू
चाळीसगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी कजगाव : कजगाव-पारोळा रोडवरील सौर ऊर्जा प्रकल्पाजवळ गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या तीन राउंड फायरिंगमध्ये जयेश ज्ञानेश्वर पवार (वय २२, रा. कजगाव) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. यातील एक गोळी त्याच्या डोक्यात लागल्याची प्राथमिक माहिती असून, त्याला तातडीने पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयेश पवार हा कजगाव-पारोळा रोडवरील सौर ऊर्जा प्रकल्पावर कामासाठी जात होता. याचदरम्यान प्रकल्पाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. अचानक झालेल्या तीन राउंड फायरिंगमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. गोळी डोक्यात लागल्याने जयेश गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. गोळीबार करणारे हल्लेखोर कोण होते, त्यांनी हा हल्ला कोणत्या कारणातून केला आणि या घटनेमागे नेमके काय कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
कामावर जात असतानाच तरुणावर गोळीबार; परिसरात भीतीचे वातावरण
कामासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणावर सौर ऊर्जा प्रकल्पाजवळ गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. कजगाव-पारोळा रोडवरील या घटनेमुळे परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गोळीबाराची घटना नेमकी कशामुळे घडली, हल्लेखोरांची संख्या किती होती आणि त्यांचा उद्देश काय होता, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पोलिसांकडून या सर्व बाबींचा तपास सुरू असून, अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करून गोळीबारामागील सत्य समोर आणावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या घटनेमुळे कजगावसह भडगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
जखमी गंभीर हा राहणार कजगाव त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी लहान मुलगा तसेच मागच्या वर्षी प्रेम विवाह केलेला होता

