भुसावळ नगर परिषदविरोधात आंदोलन; आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांची तत्पर कारवाई
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ नगर परिषदविरोधात न्याय मिळावा, या मागणीसाठी यापूर्वी दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी तसेच दि. 24 व 25 जानेवारी 2026 रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथील जी. एस. ग्राउंडवर उपोषण करूनही अपेक्षित न्याय न मिळाल्याने आज दि. 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भुसावळ नगर परिषद कार्यालयात तणावाची घटना घडली.

स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे भुसावळ तालुका अध्यक्ष श्री. मिलिंद सोनवणे यांनी झेंडा वंदन कार्यक्रमानंतर नगर परिषदविरोधात घोषणाबाजी करत टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. यावेळी भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ सतर्कता दाखवत हस्तक्षेप केला आणि श्री. सोनवणे यांना ताब्यात घेतले. त्यांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे. संबंधित मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढावा, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

