मोर नदीपात्रातून ५ डंपर , १ पोकलेनसह डंपर, २ ट्रॅक्टर जप्त.
यावल खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – तालुक्यातील पाडळसे शिवारातील मोर नदी पात्रात सुरू असलेला अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखणाऱ्या ग्रामस्थांना,तरुणांना महसूल विभागातील एका कर्मचाऱ्याने दमदाटी करीत तुम्ही शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला म्हणून तुमच्यावरच गुन्हा दाखल करू असे वक्तव्य केल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असला तरी महसुल अधिकाऱ्यांनी घटनास्थळची परिस्थिती लक्षात घेऊन मोर नदीपात्रातून ५ डंपर , २ ट्रॅक्टर १ पोकलेनसह २ ट्रॅक्टर जप्त केल्याची कडक कारवाई गेल्या आठवड्यात केल्याने अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असली तरी याबाबत तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून चर्चा सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की भुसावळ फैजपूर रोडवरील तापी नदी पुलापासून काही अंतरावर असलेल्या अकलूद ते फैजपूर मधुकर साखर कारखाना महामार्गाच्या कामासाठी गेल्या महिन्यातील महिन्यापासून मोर नदी पात्रातून बेकायदा अनधिकृत पणे वाळूचा आणि इतर ठिकाणच्या उंच टेकड्यांचे सपाटीकरण करून पिवळ्या मातीची वाहतूक उपसा मोठ्या प्रमाणात सुरू होता. मंगळवार दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पाडळसे येथील काही तरुणांनी आणि ग्रामस्थांनी मोर नदी पात्रात जाऊन अवैध उपसा करणारे कॉन्ट्रॅक्टर बी.एन.अग्रवाल यांचे ५ डंपर आणि १ पोकलेन,२ ट्रॅक्टर पकडत पोलीस पाटील यांच्या स्वाधीन केले असता पोलीस पाटील सुरेश खैरनार यांनी तातडीने यावल येथील तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना घटनेची माहिती दिली.
महसूल मधील एका सर्कलचा संताप …

तहसीलदार मोहनमाला नाझीरकर या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या उपस्थित तरुणांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टर बी एन अग्रवाल यांच्यावर कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी केली यावेळी कारवाई करण्याऐवजी महसूल कर्मचाऱ्यांनी उपस्थित ग्रामस्थ तरुणांशी हुज्जतबाजी, अरेरावी केल्याने आणि महसूल अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे घटनास्थळी पोलिसांस समक्ष तणाव निर्माण झाला होता.महसूल अधिकाऱ्यांच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी पाडळसे येथील ग्रामस्थ तरुणांनी मध्यरात्री व दुसऱ्या दिवसापर्यंत पोहोचलो पोलीस ठाण्यात या मांडला अखेर ग्रामस्थांच्या दबावामुळे पोलिसांनी दखल घेत नाम मात्र कारवाई केली आहे.
तालुक्यातील काही मंडळ अधिकारी तथा सर्कल आणि अनेक तलाठी हे आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी रहात नसून बाहेर गावाहून येणे जाणे असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेचा प्रश्न उपस्थित होऊन ते कार्यालयीन वेळेत कार्यालयात आढळून येत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी नागरिकांची अनेक कामे वेळेवर होत नाहीत त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
तापी नदी परिसरातून,अंजाळे शिवारात सर्कल,तलाठी यांच्या दुर्लक्षपणामुळे अवैध गौण खनिजाचे बेसुमार उत्खनन करून त्यातून डबर,खडी,मुरूम,कच इत्यादी गौण खनिजातून संबंधित क्रशर चालक-मालक काही संबंधित महसूल कर्मचाऱ्यांच्या संगनमताने आपली चांदी करून घेत आहे.त्याचप्रमाणे यावल तालुक्यात उंच टेकड्यांचे सपाटी करण्याचा गोरख धंदा मोठ्या प्रमाणात सुरू असून उंच टेकड्या किती फूट उंच आहेत आणि जमिनीत किती फूट खोल खड्डे केले जात आहे.यासह क्रशर चालक मालक जमिनीतून किती ब्रास गौण खनिजाचे उत्खनन करीत आहे याचे मोजमाप संबंधित सर्कल तलाठी यांनी केव्हा आणि कसे केले याबाबतची चौकशी आणि प्रत्यक्ष खात्री प्रांताधिकारी आणि यावल तहसीलदार यांनी केव्हा केली याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले असून यात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याची चर्चा ठेकेदारी वर्तुळात आणि बांधकाम क्षेत्रात आहे.