Thursday, January 29, 2026
Homeमहाराष्ट्रउत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांचा पोलीस आयुक्ताकडून सन्मान.

उत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांचा पोलीस आयुक्ताकडून सन्मान.

उत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांचा पोलीस आयुक्ताकडून सन्मान.

नाशिक खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – नाशिक रोड येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र भीमराव सपकाळे यांनी आपल्या शासकीय सेवेत, कार्यकाळात समय सूचकता बाळगत कर्तव्यदक्षतेने उत्कृष्टकार्य केल्याने तसेच गंभीर अशा गुन्ह्यांचा यशस्वीपणे तपास शोध घेणे,प्रभावीपणे पूर्ण करणे तसेच पोलीस प्रशासनास दिलेल्या जबाबदाऱ्या अत्यंत दक्षता, तत्परता आणि प्रामाणिकपणाने पार पाडणे या
उल्लेखनीय कार्यामुळे नाशिक शहरात शांतता, सुव्यवस्था व नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ होणेस मदत केल्या बद्दल त्यांना प्रशंसा पत्र देवुन गौरविण्यात आले आहे.त्यांच्या या प्रशंसनीय कामगिरीद्वारे आपण महाराष्ट्र पोलीस दलाच्या उज्वल परंपरेत निश्चित भर टाकली असून भावी काळात देखील असेच उत्कृष्ट कर्तव्य बजावीत राहाल व महाराष्ट्र पोलीस दलाच्या उज्वल परंपरेत निश्चित भर टाकाल असे प्रशंसा पत्रात नमूद केले आहे.प्रजासत्ताक दिनी म्हणजेच
सोमवार दि.२६ जानेवारी २०२६ रोजी पोलीस आयुक्त नाशिकचे माननीय संदिप प्रकाश कर्णिक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून त्यांना गौरविण्यात आले आहे.या यशाबद्दल जितेंद्र सपकाळे यांचे पोलीस दलात व त्यांच्या हितचिंतकांमध्ये सर्वत्र अभिनंदन होत आहे .
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या