Thursday, January 29, 2026
Homeजळगावजळगांव जिल्हा राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला टीम व कपिलेश्वर महादेव महिला...

जळगांव जिल्हा राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला टीम व कपिलेश्वर महादेव महिला मंडळातर्फे हार्दिक कुंकूचे भव्य सोहळा उत्साहात संपन्न

राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला टीम व कपिलेश्वर महादेव महिला मंडळातर्फे हार्दिक कुंकूचे भव्य सोहळा उत्साहात संपन्न

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  – 25 जानेवारी रोजी सायंकाळी 5 ते 9 यावेळेत हळदी कुंकू सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या आयोजन सौ सारिकाताई राजपूत जिल्हाध्यक्ष करणी सेना यांच्या वतीने करण्यात आले होते . या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती वरणगावचे लोकनियुक्त नगरसेविका सौ तृप्ती ताई महाजन, पतंजली योग राज्य कार्यकारिणी सदस्य सौ महानंदाताई पाटील वरणगाव फॅक्टरी येथील पद्मावती ग्रुपचे अध्यक्ष सौ वैशालीताई राजपूत
कपिलेश्वर महिला मंडळाचे अध्यक्ष सौ दिपालीताई चौधरी यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना सौ तृप्ती ताई महाजन यांनी महिला जनजागृती संघटन आजच्या काळाची गरज असून महिलांना स्वतः संरक्षण कसे करता येईल यावर प्रबोधन केले व स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने महत्व सांगितले तसेच सौं सारिकाताई राजपूत यांनी समाज जनजागृती व महिलांना लाठीकाठी प्रशिक्षण स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा संकल्प यावेळी केला व या कार्यक्रमास सुरुवात केली महिलांचे मनोरंजन व्हावे म्हणून उखाणे विविध प्रकारचे खेळ संगीत खुर्ची सारखी महिलांचे कार्यक्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ मीनाताई राजपूत,
कविता राजपूत, संगीता राजपूत,संजना राजपूत, वैशाली सावकारे, संध्या चंदेल,सविता राजपूत,कोकिळा राजपूत,निशा चौधरी,जयश्री नारखेडे तसेच प्रतीक्षा राजपूत,जागृती राजपूत,सविता मोरे, भारती चव्हाण, अनिता राजपूत, प्रियंका राजपूत, सपना राजपूत, प्रमिला राजपूत आदी महिलांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी अल्पोहाराचा आनंद घेऊन कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली या कामी श्री कपिलेश्वर महादेव मंदिर ग्रुपचे मोलाचे सहकार्य लाभले
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या