Thursday, January 29, 2026
Homeजळगावश्री स्वामिनारायण गुरुकुल मध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

श्री स्वामिनारायण गुरुकुल मध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

श्री स्वामिनारायण गुरुकुल मध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               भुसावळ: तालुक्यातील साकेगाव येथील श्री.स्वामिनारायण गुरुकुल विद्यालयात 26 जानेवारी रोजी देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साह पूर्ण व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात देशाचे संविधान वाचन करून ध्वजारोहणाने झाली. याप्रसंगी प्रमुख अतिथी धीरज कुरकुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पी.एस. लोखंडे सर, शशिकांत कोल्हे सर, जे.के. भिरूड , संचालक गोपाळ भगत, लताताई भिरुड आदी उपस्थित होते. प्राथमिक मुख्याध्यापक मनोज भोसले ,अभिष सरोदे, मुख्याध्यापिका प्रणिता चौधरी मॅडम, उज्वला धांडे मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. तर काही विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व आकर्षक मानवी पिरॅमिड (मनोरा) सादर करून देशप्रेम, एकता व शौर्याचा संदेश दिला.या सादरीकरणाला उपस्थितांकडून उस्फूर्त टाळ्यांची दाद मिळाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे मा.श्री. धीरज कुरकुरे यांनी मार्गदर्शनपर भाषणात भारतीय संविधानाचे महत्त्व व नागरिकांची कर्तव्य व जबाबदाऱ्या तसेच राष्ट्रप्रेमाची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे महत्व विशद केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या