Thursday, January 29, 2026
Homeजळगावजलंब स्थानकावर 'ब्लॉक'मुळे भुसावळ-बडनेरा मेमूसह अनेक गाड्या रद्द

जलंब स्थानकावर ‘ब्लॉक’मुळे भुसावळ-बडनेरा मेमूसह अनेक गाड्या रद्द

३० जानेवारी रोजी यार्ड रिमॉडेलिंगचे काम; अनेक गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल 

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – भुसावळ-बडनेरा रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या जलंब रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी रेल्वे प्रशासनातर्फे विशेष ‘ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या तांत्रिक कामामुळे ३० जानेवारी रोजी भुसावळ-बडनेरा मार्गावरील मेमूसह काही महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर अनेक एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन (वेळ बदलणे) करण्यात येणार आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

​जलंब स्थानकावरील कामामुळे प्रवाशांची मोठी गर्दी असलेल्या खालील गाड्या रद्द राहतील:
६११०१/६११०२ भुसावळ-बडनेरा-भुसावळ मेमू. , १११२१/१११२२ भुसावळ-वर्धा-भुसावळ एक्स्प्रेस. , ०१२११ बडनेरा-नाशिक रोड विशेष ट्रेन (३० जानेवारी). ,०१२१२ नाशिक रोड-बडनेरा विशेष ट्रेन (२९ जानेवारी).
​या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
​ब्लॉकच्या कालावधीत काही गाड्या विविध स्थानकांवर थांबवून ठेवल्या जाणार असल्याने त्यांचा प्रवास उशिराने होणार आहे:
​अजमेर-पुरी एक्सप्रेस (२०८२४): २ तास ३० मिनिटे उशिराने धावेल.अम्ब अन्दौरा-नांदेड एक्सप्रेस (२२७१०): २ तास उशिराने.
​गोंदिया-कोल्हापूर एक्सप्रेस (११०४०): २ तास उशिराने.
​नांदेड-जम्मू तवी एक्सप्रेस (१२७५१): १ तास ३० मिनिटे उशिराने.
प्रवाशांना सहकार्याचे आवाहन
​रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, डाऊन लूप लाईनचा विस्तार आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हे तांत्रिक काम अत्यंत आवश्यक आहे. प्रवाशांनी होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वेला सहकार्य करावे आणि आपले प्रवासाचे नियोजन या बदललेल्या वेळापत्रकानुसार करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या