भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी साक्री ता. भुसावळ येथील दोन अल्पवयीन मुलींच्या झालेल्या निर्घृण हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना( शिंदे गट ) महिला जिल्हाप्रमुख सौ. नंदाताई प्रकाश निकम यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व याप्रसंगी सौ.नंदाताई निकम यांनी सदर हत्याकांडास जबाबदार असलेल्या आरोपींना लवकरात लवकर जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यासाठी शासन दरबारी शक्य तितका

पाठपुरावा करून पीडित कुटुंबास न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. संशयित हा अल्पवयीन असला तरी त्याने केलेले कृत्य हे खुना चे असल्यामुळे त्याला कठोर शिक्षा म्हणजेच फाशी ची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली .
या प्रसंगी शिवसेना माजी आमदार दिलीपभाऊ भोळे, समाजसेवक श्री प्रकाशभाऊ निकम, सुरेश कोल्हे, आनंद नरवाडे, इशा शेख गोलू शाह, अतुल भारंबे, अमिता भैसारे, ज्योती तायडे, कल्पना महाजन सविता चौधरी मनीषा यादव व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

